नवी दिल्ली : तुमचा आवडता पोषाक कोणता म्हटल्यावर आपल्यापैकी अनेक पुरूष पॅन्ट शर्ट, किंवा जिन्स पॅन्ट टी-शर्ट्स असं उत्तर देतील. पण, नुकत्याच झालेल्या एका सर्व्हेनुसार भलतेच वास्तव पुढे आले आहे. पॅन्ट-शर्ट, सदरा-लेंगा किंवा जिन्स पॅन्ट टीशर्ट्स नव्हे तर, चक्क लुंगी आणि त्यावर कोणत्याही प्रकारचे शर्ट, बंडी, कुर्ता हे भारतीयांचा आवडता पोषाख असल्याचे पुढे आले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लुंगी भरली मनात


राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयाने नुकत्याच जाहीर केलेल्या 2011-12च्या आकडेवारीनुसार, सर्वाधीक भारतीय हे लुंगीला प्राधान्य देत असल्याचे पुढे आले आहे. लुंगीनंतर धोतर आणि कुर्ता-पायजम्याने बाजी मारली आहे.


52 टक्के लुंगी, 21 टक्के धोतर, तर, 13 टक्के पायजमा


राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयाने एक लाख नागरिकांसोबत चर्चा करून सर्व्हे केला. यात 52 टक्के लोकांनी लुंगीला पसंती दिली. वर्षभरात आपण जास्तीत जास्त वेळा लुंगीच खरेदी करत असल्याचेही या लोकांनी सांगितले. तर, 21 टक्के लोकांनी धोतर, आणि 13 टक्के लोकांनी पायजमा खरेदी करत असल्याचे सांगितले.


लुंगीनेच मारली बाजी


खास करून लुंगी आणि धोतर ही दक्षिण आणि पूर्व भारतात वापरले जाते. उत्तर भारतात खास करून कुर्ता पायजमा वापरतात. तर केवळ लुंगी वापरण्यात ओडिसा प्रथम क्रमांकावर आहे. त्यानंतर बिहार, पश्‍चिम बंगाल, त्रिपुरा, तामिळनाडू यांचा लुंगी वापरणाऱ्या राज्यांमध्ये नंबर लागतो. कुर्ता-पायजमा घालणार्‍यांमध्ये हरियाणा-दिल्‍ली ही राज्ये अव्वल आहेत. त्यामुळे एकूण आकडेवारी लक्षात घेता जीन्स, टी-शर्ट, पॅन्ट शर्ट पेक्षा लुंगीनेच बाजी मारल्याचे दिसते.