मुंबई : सध्या आधारकार्ड महत्त्वपूर्ण ठरत आहे. कारण अनेक महत्त्वाच्या गोष्टी आणि आर्थिक व्यवहार यासाठी आधार कार्ड असणे गरजेचे आहे. त्यामुळे सतत सोबत आधारकार्ड बाळगावे लागते. मात्र आधारकार्ड विसरणे महागात पडू नये. म्हणून सरकारने नुकतेच ‘एम आधारअॅप’ सुरु केले आहे. हे अॅप्लिकेशन जुलै महिन्यात लॉन्च करण्यात आले होते. त्यानंतर त्यात अनेक सुधारणा करण्यात आल्या. या अॅपमुळे आधारकार्ड मोबाईलवर सॉफ्ट कॉपीच्या स्वरुपात उपलब्ध होऊ शकते. वन टाईम पासवर्डच्या माध्यमातून हे आधारकार्ड मोबाईलवर अॅक्सेस करता येणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोबाईलवर आधारकार्ड अॅक्सेस झाल्यास ते हाताळणे सोपे होईल. त्यामुळे तुम्ही देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात असाल तरीही अगदी सहजपणे हे कार्ड तुम्हाला मोबाईलवर उपलब्ध होऊ शकेल. याशिवाय विशिष्ट कालावधीसाठी असणारा ओटीपी टाकून नागरिकांना हे अॅप्लिकेशन डाऊनलोड करता येणार आहे. यासाठी ३० सेकंदाचा कालावधी देण्यात आला आहे. प्रोफाईल ओपन केल्यावर पासवर्ड सुरक्षित ठेवला जाईल. आतापर्यंत १० लाख लोकांनी हे अॅप डाऊनलोड केले आहे.