नवी दिल्ली : मध्यप्रदेश आणि मिझोराम विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे भाजपा आणि काँग्रेसचे सगळे दिग्गज आज प्रचारासाठी मैदानात आहेत. येत्या २८ तारखेला मध्यप्रदेशातील विधानसभेच्या २३० जागांसाठी एकाच दिवशी मतदान होणार आहे. तर मिझोराम विधानसभेच्या ४० जागांसाठीही एकाच टप्प्यात मतदान होईल.पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यध्य अमित शाह, मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान,याशिवाय प्रदेश आणि केंद्रीय स्तरावरील अनेक नेते सध्या मध्यप्रदेशाच्या प्रचारात सक्रीय आहेत. आज संध्याकाळी पाच वाजता प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत.


कॉंग्रेसने मोहिम छेडली


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या प्रचाराचा नाराळ ६ जूनला मंदसौरमध्ये फोडला.


त्यानंतर राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली मध्यप्रदेशातील शिवराजसिंह चौहान यांच्या सरकारच्या विरोधात काँग्रेसनं मोठी मोहिम छेडली.


ज्योतिरादित्य शिंदे, कमलनाथ, विरोधीपक्ष नेते अजय सिंह यांच्यासह माजी पंतप्रधान मनमोहन सिंह, पंजाबमध्ये सांस्कृतीक कार्यमंत्री नवज्योतसिंह सिद्धू आणि काँग्रेसच्या केंद्रीय फळीतले अनेक दिग्गज नेते प्रचाराच्या निमित्तानं राज्यभर फिरत आहेत. त्यांच्या प्रचाराला किती यश येतंय ? हे येत्या ११ डिसेंबरला ठरणार आहे.