दिल्ली : बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) जबलपूर (Jabalpur) आरटीओ (RTO)अधिकारी संतोष पाल सिंह यांच्या घरावर बुधवारी आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) छापा टाकला. आरटीओ अधिकार्‍याची मालमत्ता पाहिल्यावर अधिकार्‍यांची झोपच उडाली. या आरटीओच्या घरातून त्याच्या उत्पन्नापेक्षा 650 पट जास्त किमतीची मालमत्ता मिळण्याची शक्यता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संतोष पाल सिंह यांच्याकडे उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता असल्याच्या अनेक दिवसांपासून तक्रारी येत होत्या. त्यानंतर स्वरणजितसिंग धामी यांच्या नेतृत्वाखाली तपास करण्यात आला. संतोष पाल आणि त्यांची पत्नी रेखा पाल यासुद्धा आरटीओमध्येच लिपिक असून, त्यांच्याकडे त्यांच्या मूळ उत्पन्नाच्या स्त्रोतांपेक्षा 650 टक्के जास्त मालमत्ता असल्याचे तपासात आढळून आले आहे. त्यांच्या सेवेच्या काळात त्यांनी कमावलेल्या पैशापेक्षा त्याची संपत्ती 650 टक्के जास्त आहे.


संतोष पाल यांच्याकडे 6 निवासी घरे, एक फार्म हाऊस, एक स्कॉर्पिओ, एक आय 20 कार, 2 मोटारसायकल आहेत. त्यांच्या सर्व निवासस्थानांवर आर्थिक गुन्हे शाखेचा शोध सुरू आहे. संतोष पाल यांनी एवढी मालमत्ता कशी जमा केली याचा शोध घेण्याचा अधिकारी प्रयत्न करत आहेत.


आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस अधीक्षक देवेंद्र प्रताप सिंग राजपूत म्हणाले की, आम्हाला सतत बेहिशोबी मालमत्तेच्या तक्रारी येत होत्या. तपासादरम्यान, प्रादेशिक परिवहन कार्यालय जबलपूर येथे तैनात असलेल्या आरटीओ अधिकारी संतोष पाल आणि त्यांची पत्नी रेखा पाल लिपिक यांनी बेहिशोबी मालमत्ता जमा केल्याचे आढळून आले.



त्यानंतर बुधवारी रात्री 11 वाजता संतोष पाल यांच्या घरासह सर्व ठिकाणी छापे टाकण्यात आले.  संतोष पाल यांच्या तीन घरांवर छापेमारी सुरूच आहे. आतापर्यंत, आर्थिक गुन्हे शाखेच्या कारवाईत, संतोष पाल यांना पीपी कॉलनी, ग्वारीघाट, जबलपूर येथे निवासी घर मिळाले जे 1247 चौरस फूट आहे