ग्वालियर : मध्य प्रदेशच्या राजकारणातून एक मोठे वृत्त समोर येत आहे. यानुसार ज्योतिरादित्य सिंधिया यांनी कॉंग्रेस पक्षाला अल्टिमेटम दिले आहे. मला मध्य प्रदेश कॉंग्रेसचा अध्यक्ष न बनवल्यास मी राजीनामा देईन आणि पक्ष देखील सोडेन असे यात म्हटल्याचे सांगण्यात येत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मध्य प्रदेश सरकारच्या कमलनाथ सरकारचे कॅबिनेट मंत्री आणि सिंधिया समर्थक प्रद्युमन सिंह तोमर यांनी ही केवळ अफवा असल्याचे म्हटले आहे. पदाच्या लालसेत सिंधियाची असे काही करणार नाहीत असे प्रद्युमन सिंह यांनी स्पष्ट केले. ते केवळ समाजसेवेसाठी राजकारण करतात. काहीजण आहेत जे अफवा पसरवत आहेत. पण सिंधिया यांनी प्रदेशाध्यक्ष बनावे ही कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची भावना असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 



गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मध्य प्रदेश प्रदेशाध्यक्ष सिंधीया यांनी बनावे ही मागणी जोर धरत आहे. एमपी कॉंग्रेस अध्यक्ष पदावरून तिथे घमासान सुरु आहे. या दरम्यान कमलनाथ यांनी स्वत: सोनिया गांधी यांची भेट घेतली.