Crime News: `बाबा मला वाचवा...`, हॉटेल रुममधून मुलीने केला फोन; पोहोचून पाहिलं तर सर्वांनाच बसला धक्का
हॉटलेमध्ये चेक इन केल्यानंतर काही वेळातच यांचे मृतदेह आढळून आले. यांच्या मृत्यूमुळे एकच खळबळ उडाली आहे.
Madhya Pradesh Crime News : मध्यप्रदेशातील इंदोरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. आपल्या प्रियकरासोबत एका हॉटेलमध्ये गेलेल्या तरुणीचा मृत्यू झाला आहे. या तरुणीसह तिच्या प्रियकराचा देखील मृतदेह आढळून आला आहे. विशेष म्हणजे मृत्यूच्या काही वेळ आगोदरच या तरुणीच्या वडिलांनी तिला फोन केला होता. तेव्हा तिने "बाबा मला वाचवा..." असं म्हणत विनवणी केली होती. मुलीचे कुटुंबियांनी तात्काळ हॉटेलच्या ठिकाणी धाव घेतली. मात्र, तो पर्यंत दोघांचा मृत्यू झाला होता. या तरुणीच्या कुटुंबियांना हॉटेलवर जे दिसल ते पाहून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली.
इंदोरच्या विजयनगर परिसरातील एका हॉटेलमध्ये या जोडप्याचे मृतदेह आढळून आले आहेत. शनिवारी सकाळी दोघांनी या हॉटेलमध्ये एक रुम बुक केला होता. हॉटलेमध्ये चेक इन केल्यानंतर काही वेळातच यांचे मृतदेह आढळून आले. या दोघांचा मृत्यू विष प्राशन केल्याने झाल्याची माहिती प्राथमिक तपासात समोर आली आहे. यामुळे यांच्या हत्येचे गुढ वाढले आहे.
मृत तरुण आणि तरुणी दोघेही इंदोरचे राहणारे आहेत. तरुणीचे वय 23 तर तरुण हा 25 वर्षांचा आहे. त्यांचे एकमेकांवर प्रेम होते. मात्र, त्यांचे प्रेमसंबधन त्यांच्या कुटुंबियांना मान्य नव्हते. यामुळेच कुटुंबाच्या विरोधाला कंटाळून त्यांनी टोकाचे पाऊल उचलले.
हॉटेलवर गेले आणि तिथेच मृत्यू झाला
हे जोडपं एकत्र एका हॉटेलवर गेले होते. यावेळी तरुणीच्या वडिलांच्या फोन. तरुणीने वडिलांचा फोन उचलला आणि "बाबा मला वाचवा...", असं म्हणत त्यांना विनवणी केली. वडिलांना तिने आपण कुठे आहोत याचा पत्ता दिला. तरुणीच्या वडिलांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधला. यानंतर पोलिसांनी हॉटेल मॅनेजमेंटला कॉल करुन याबाबत चौकशी केली. पोलिसांच्या फोननंतर हॉटेल स्टाफने त्यांच्या रुमचा दरवाजा ठोठावला. मात्र, काहीच प्रतिसाद मिळाला नाही. तोपर्यंत पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दरवाजा तोडून रुममध्ये प्रवेश केला. मात्र, बेडवर दोघेही मृताअवस्थेत आढळून आले. प्राथमित तपासात विष प्राशन केल्याने दोघांचा मृत्यू झाल्याचा माहिती समोर आली आहे. दोघांचे एकमेकांवर जीवापाड प्रेम होते. मात्र, कुटुंबियांचा त्यांच्या लग्नाला विरोध होता. यामुळे कुटुंबियांचे मन वळवण्यासाठी आत्महत्या करण्याची योजना त्यांनी आखली. मात्र, या घटनेत दोघांचाही मृत्यू झाला आहे.