Madhya Pradesh Accident : दिवाळीला गालबोट, रस्ता अपघातात 14 ठार तर 40 जखमी
Road Accident News : दिवाळीचा सण सुरु असताना एका भीषण अपघाताची घटना घडली आहे. यामुळे दिवाळीला गालबोट लागले आहे. रीवा येथील सुहागी हिल्सजवळ बस आणि ट्रक यांच्यात झालेल्या अपघातात 14 जणांचा मृत्यू आणि 40 जण जखमी झाले आहेत
Madhya Pradesh Road Accident News : दिवाळीचा सण सुरु असताना एका भीषण अपघाताची घटना घडली आहे. यामुळे दिवाळीला गालबोट लागले आहे. मध्य प्रदेशातील रीवा येथील सुहागी हिल्सजवळ बस आणि ट्रक यांच्यात झालेल्या अपघातात 14 जणांचा मृत्यू आणि 40 जण जखमी झाले आहेत. बस हैदराबादहून गोरखपूरला जात होती. बसमधील सर्व लोक उत्तर प्रदेशातील रहिवासी असल्याची माहिती असल्याचे सांगण्यात येत आहे. ( 14 dead, 40 injured in a collision between a bus and trolley near Suhagi Hills in Rewa, Madhya Pradesh )
मध्य प्रदेशातील रीवाजवळ (MP Rewa Accident) राष्ट्रीय महामार्ग-30 वर हा भीषण रस्ता अपघात झाला आहे. या अपघातात आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाल्याची रीवा पोलिसांनी दुजोरा दिला आहे. या भीषण आणि वेदनादायक अपघातात 40 जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. घटनास्थळावरी लोकांनी याची माहिती पोलिसांनी दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमींना रुग्णालयात दाखल केले.
रीवा येथील सुहागी टेकडीजवळ बस आणि ट्रक यांच्यात भीषण टक्कर झाल्याने घटनास्थळी गोंधळ उडाला. रीवाचे एसपी नवनीत भसीन यांनी सांगितले की, बस हैदराबादहून गोरखपूरला जात होती. बसमधील सर्व लोक यूपीचे रहिवासी असल्याची माहिती आहे. ते दिवाळीनिमित्ताने गाळी परतत होते, अशी माहिती मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सर्व मजूर कामगार बसमध्ये होते. ते त्यांच्या घरी दिवाळी साजरी करण्यासाठी जात होते. ही बस घाट उतरत असताना अपघाताची घटना घडली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, अपघाताचा बळी ठरलेल्या बसच्या केबिनमध्ये 3-4 लोक अडकले होते.
मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी रीवा येथील या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांप्रती दु:ख व्यक्त केले आहे. देव मृतांच्या आत्म्याला शांती देवो, असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री 11.30 च्या सुमारास डोंगर दरीत हा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच प्रशासनाने सोहागी टेकडीवर बचावकार्य सुरु केले आहे.