करुणानिधी यांच्या अंत्यसंस्काराच्या जागेवरून वाद
चेन्नईमध्ये कावेरी हॉस्पीटलच्या बाहेर डीएके समर्थकांनी धुमाकूळ घातला
चेन्नई : तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि डीएमके प्रमुख एम करुणानिधी यांच्या निधानानंतर त्यांच्या अंत्यसंस्काराच्या जागेवरून वाद उभा राहिलाय. एआयएडीएमके सरकारनं एम करुणानिधी यांच्या अंत्यसंस्कारासाठी मरीना बीचवर जागा देण्यास नकार दिला. हे प्रकरण रात्री उशिरा न्यायालयापर्यंत पोहचलं. मद्रास हायकोर्टानं बुधवारी सकाळी ८ वाजता या प्रकरणावर सुनावणी सुरु केलीय.
करुणानिधी यांच्या निधनानंतर विरोधी पक्ष डीएमकेनं करुणानिधी यांच्या दफनविधीसाठी मरीना बीचवर जागा दिली जावी. सरकारनं याला नकार दिल्यानंतर चेन्नईमध्ये कावेरी हॉस्पीटलच्या बाहेर डीएके समर्थकांनी धुमाकूळ घातला.
दरम्यान, द्रमुक पक्षाचे सर्वेसर्वा एम. करुणानिधी यांच्या निधनानंतर तामिळनाडूत सात दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आलाय. गेल्या महिन्याभरापासून त्यांची प्रकृती खालावली होती. त्यांच्यावर चेन्नईतील कावेरी रुग्णालयात उपचार सुरु होते. दरम्यान, त्यांना कावेरी रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी आणि चाहत्यांनी रुग्णालयासमोर प्रचंड गर्दी केली होती. खबरदारीचा उपाय म्हणून चेन्नईत पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय.