नवी दिल्ली : शिया बोर्डाचे चेअरमन वसिम रिझवी यांनी पंतप्रधान मोदी आणि युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना लिहिलेल्या पत्रात मदरशांबद्दल लिहिलंय. 


वसिम रिझवीचं पत्र


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपल्या पत्रात वसिम रिझवी यांनी लिहिलंय, की मदरशांमध्ये दहशतवाद्यांना खतपाणी घातलं जात. तिथे डॉक्टर आणि इंजिनियर तयार न होता, दहशतवादीच तयार होत आहेत. त्यामुळे त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी प्रयत्न करायची आवश्यकता आहे. मदरशांनी किती इंजिनियर, डॉक्टर, आयएएस अधिकारी घडवले असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे. पण मदरशांनी दहशतवादी मात्र बनवले, असं आपल्या पत्रात रिझवी यांनी म्हटलं आहे.


धार्मिक शिक्षण ऐच्छिक करावं


आपला मुद्दा पुढे मांडताना, रिझवी सूचवतात की मदरशांना इतर औपचारिक शिक्षण मंडळांच्या अखत्यारित आणलं पाहीजे. सीबीएसई, आयसीएसईशी मदरशांना जोडलं गेलं पाहीजे. मुसलमान विद्यार्थ्यांना धार्मिक शिक्षणाची सक्ती करता कामा नये. धार्मिक शिक्षण हे ऐच्छिक केलं पाहीजे. पंतप्रधानांना आणि युपीच्या मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात रिझवी म्हणतात असं केल्यानं आपलं राष्ट्र अधिक सक्षम होईल.


रिझवी एक विदूषक


अनेक कट्टर मुस्लिम संघटनांनी मात्र रिझवी यांच्यावर टिकेची झोड उठवली आहे. असदुद्दीन ओवेसी यांनी रिझवीवर कडक शब्दात टिका केली आहे. रिझवी हे एक विदूषक आहेत. ते प्रचंड संधीसाधू व्यक्ती आहेत. त्यांनी आपला आत्माच संघपरिवाराला विकला आहे. एकातरी मदरशांमध्ये दहशतवादी घडवला जात असल्याचं रिझवी यांनी दाखवून द्यावं, असं आव्हानही ओवेसी यांनी दिलंय.