Mahakumbh 2025 Naga Sadhu :   जगातील सर्वात मोठा मेळा अशी ओळख असलेल्या महाकुंभ मेळा प्रयागराज येथे सुरु आहे. महाकुंभ मेळा  45 दिवस म्हणजेच 26 फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे. महाकुंभात अनेक लोक साधू बनतात. साधू बनण्यासाठी ब्रह्मचारी जीवन स्वीकारावे लागते आणि सांसारिक सुखांचा त्याग करावा लागतो. मात्र, नागा साधू होण्यासाठी अत्यंत कठिण चाचण्या द्याव्या लागतात. नागा साधू होणाऱ्यांना   'टांगतोड' ही अत्यंत भयानक प्रक्रियेतून जावे लागते. यात लिंग खेचून निकामी केलं जातं. वेदनादायी अशी प्रक्रिया अत्यंत गुप्तपणे पार पाडली जाते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अंगावर फासेललं भस्म, डोक्यावर केसांच्या जटांचे टोपलं. कुंभ मेळ्यांमध्ये अशा प्रकारचे नागा साधू पहायला मिळतात. सहजासहजी कुणाच्याही दृष्टीक्षेपात न येणारे नागा साधू कुंभ मेळ्यादिवशी एकत्र दिसतात. महाकुंभात पवित्र स्नान करण्याचा पहिला मान हा नागा साधू यांनाच असतो. त्याग, तपश्चर्या आणि साधनेसाठी आपले जीवन पूर्णपणे समर्पित करणाऱ्या नागा साधूंचे आयुष्य खूपच रहस्यमयी मानले जाते. 


नागा साधू हे नग्न राहतात. मात्र, नागा साधू होणं फारच कठिण आहे. अनेक गोष्टींचा त्याग करावा लागतो.   निवस्त्र फिरणारे नागा साधू थंडीपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी नागा साधू योग करतात. नागू साधूंना 12 -15  वर्ष दररोज ब्रह्मचर्याचं पालन करावं लागत. 


नागा साधू बनणं वाटत तितकं सोपं नाहीये यासाठी कठोर तपस्या करावी लागते.  नागा साधूंना अंगावरच्या कपड्यांचा त्याग करावा लागतो.  नागा साधू बनण्यासाठी जिवंतपणीच स्वतःच पिंडदान करावं लागतं. नागा साधू बनण्यासाठी 12 वर्षांचा कालावधी लागतो. या दरम्यान त्यांना गुरुंची सेवा करावी लागते. त्याची योग्यता तपासल्यानंतर गुरुंकडून त्याला नागा संन्यासी होण्यासाठीची दीक्षा दिली जाते. कुंभमेळ्यात त्यांचे  पिंडदान केले जाते. यानंतर टांगतोड प्रक्रिया केली जाते. नागू साधू होणाऱ्यांच्या सर्वोच गुरुंकडून टांगतोड प्रक्रिया केली जाते. सर्वोच गुरु विशेष मुद्रेमध्ये त्याच्या लिंगाला पकडतात, एक विशिष्ट मंत्र म्हणतात आणि तीनवेळा जोरदार झटका देतात. नागा संन्यासी होऊ इच्छिणाऱ्या साधूचं लिंग खेचून निकामी केलं जातं. यालाच 'टांगतोंड' असंही म्हटलं जातं. नागा साधू होणाऱ्यांना या अत्यंत वेदनादायी प्रक्रियेतून जावेच लागते. ही प्रक्रिया अत्यंत गुप्तपणे केली जाते.