मुंबई : २ वर्षापूर्वी २३० रुपये किलोने विकली जाणारी तूर डाळ देशाच्या जनतेला कमी दरात देणार मिळणार आहे. महाराष्ट्र राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्य सरकारने निर्णय घेतला आहे की, त्यांच्या स्टॉकमध्ये असलेली २५ लाख क्विंटल तूर डाळीचे ते मिलिंग करणार आहेत. एक किलो आणि ५ किलोग्रॅम पॅकिंगमध्ये त्याचे पॅकिंग करणार असून. नंतर ही पॅकिंग रिटेल व्यापाऱ्यांनी विकली जाणार आहे. 


ही तूर डाळ ५५ रुपये प्रति किलोने विकली जाणार आहे. यासह, दारिद्र्य रेषेच्या वरील रेशन कार्ड असलेल्या कुटुंबांना देखील ही डाळ विकत घेण्याचा अधिकार असेल.


२ वर्षांपूर्वी देशात २०१५ च्या सुमारास तूर डाळीचे दर आकाशाला भिडले होते. २३० रुपयांपर्यंत डाळीचे भाव पोहोचले होते. परंतु त्यानंतर २०१६ मध्ये मान्सून चांगला होता आणि म्हणून तूर डाळीचे एकूण उत्पादन ४७.८ दशलक्ष टन झाले. 


तूर व्यतिरिक्त इतरही डाळींचे चांगले उत्पादन झाले आहे. या वर्षाअखेर देशात सुमारे ४० लाख टन तुरीचे उत्पादन अपेक्षित आहे. जे सरासरीपेक्षा तुलनेने चांगले आहे.