Weather Update : देशातील 11 राज्यांमध्ये हवामान बिघडणार; उन्हाच्या तीव्रतेसोबतच बर्फ, गारांचा मारा होणार
Latest Weather Update : हिवाळ्यानं देशातून काढता पाय घेतला असला तरीही काही राज्यांमध्ये अद्यापही अशी परिस्थिती आली नसल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच हवामान खात्याच्या अंदाजामुळं चिंता आणखी वाढली आहे.
Latest Weather Update : महाराष्ट्रातील (Maharashtra Weather Update ) काही भागांमध्ये तापमानानं उच्चांक गाठलेला असतानाच काही भागांना पाऊस आणि गारपीटीचा तडाखा बसणार अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. देशातील परिस्थितीसुद्धा याहून वेगळी नाही. हवामान खात्याच्या अंदाजानुसार मध्य प्रदेशचा दक्षिण भाग, महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा आणि दक्षिणेकडील तेलंगणा आणि उत्तर कर्नाटकातील काही क्षेत्रांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. देशातील बहुतांश दक्षिण किनारपट्टी प्रदेशामध्ये 16 ते 22 मार्चपर्यंत वादळी वाऱ्यांसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या भागांमध्ये वीजांचा कडकडाटही होऊ शकतो (Rain Alert). थोडक्यात देशातील 11 राज्यांमध्ये हवामानाचे तालरंग बिघडताना दिसतील. (maharashtra india weather update IMD issues rain and hailstorm alert amid heat wave latest Marathi news)
15 ते 17 मार्च या काळात मध्य, दक्षिण आणि पूर्व भारतातील काही भागांमध्ये पावसाची हजेरी असू शकते. तर, पश्चिम बंगालच्या उप हिमालयीन (Himalayan ranges) क्षेत्रामध्ये येणाऱ्या सिक्कीम, उत्तर भारतात ताशी 35 ते 40 किमी वेगानं वारे वाहू शकतात.
कुठे वाढणार उन्हाचा तडाखा?
IMD च्या माहितीनुसार पश्चिम भारतामध्ये पुढील तीन दिवसांमध्ये तापमानात लक्षणीय वाढ नोंदवली जाऊ शकते. शिवाय मध्य भारतातही तापमान 2 अंशांनी वाढू शकतं. देशातील काही भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असली तरीही उकाडा फारसा कमी होणार नाही.
उत्तराखंडमध्ये पुन्हा एकदा यलो अलर्ट....
पुढील काही दिवस (Uttarakhand) उत्तराखंडमधील उत्तरकाशी, रुद्रप्रयाग, चमोली, बागेश्वर आणि इतरही काही भागांमध्ये पावसासह बर्फवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामानाची ही स्थिती पाहता सध्या या भागासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर, नैनिताल, देहरादून, उधमसिंह या भागात हवामान कोरडं असेल.
हेसुद्धा वाचा : Rain Alert: पुढील 4 दिवस महत्त्वाचे; महाराष्ट्रातील 'या' भागात गारपिटीसह पावसाची शक्यता
एकाएकी का बदललं हवामान?
देशभरात गेल्या काही दिवसांपासू हवामानात बऱ्याच बदलांची नोंद करण्यात आली आहे. पश्चिमी झंझावातामुळं पश्चिमी हिमालयीन क्षेत्र आणि मैदानी भागांमध्ये पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. तर, पूर्व मध्य प्रदेश आणि तेलंगाणा येथे चक्रिवादळसदृश परिस्थिती तयार झाली आहे. त्यात बंगालची खाडी आणि अरबी समुद्र तटीय भागात आर्द्रता वाढल्यामुळं पावसाळी वातावरणनिर्मिती झाली आहे. पाकिस्तानच्या पश्चिम भागात चक्रीवादळसदृश परिस्थितीचेही काही अंशी परिणाम भारतातील हवामानावर होताना दिसत आहेत.