गुवाहाटी : विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. यानंतर राज्याच्या राजकीय सत्तानाट्याला वेग आला आहे. गुवाहाटीत असलेल्या एकनाथ शिंदे गटातील बंडखोर आमदार हे उद्या 29 जूनला दुपारी 12 वाजता हॉटेल सोडणार (Hotel Radisson) असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यानुसार या सर्व आमदारांना तयार राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सध्या हे बंडखोर आमदार गुवाहाटीतील हॉटेल रेडिसन ब्ल्यूमध्ये थांबलेले आहेत. (maharashtra political crisis rebel mla who is staying in guwahati  will leave hotel on june 29 at 12 noon sources info)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अवघ्या 3 दिवसांपूर्वी या बंडखोर आमदारांसाठी 3 दिवसांचं म्हणजेच 30 जूनपर्यंत बुकिंग करण्यात आलं होतं. मात्र तेव्हा आमदारांना तोवर थांबाव लागणार की नाही हे निश्चित नव्हतं. मात्र आता मिळालेल्या माहितीनुसार, आमदारांना तयार राहण्यास सांगण्यात आलं आहे. मात्र या आमदारांचा पुढचा मुक्काम कुठे असेल याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.


भाजप नेत्यांची राज्यपालांना भेट


दरम्यान काही वेळेपूर्वी भाजपच्या शिष्टमंडळाने राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांना बहुमत चाचणी घेण्याचं पत्र दिलं. त्यामुळे आता राज्यपालांच्या पुढील भूमिकेकडे देशाचं लक्ष लागून राहिलं आहे.