स्वातंत्र्याचा आनंद साजरा करताना खूप दूर होते महात्मा गांधी? काय होतं कारण?
Mahatma Gandhi In Noakhali: स्वातंत्र्य चळवळीतील महानायक महात्मा गांधी दिल्लीतील जल्लोषात उपस्थित नव्हते. ते दिल्लीपासून हजारो किलोमीटर दूर होते.
Mahatma Gandhi In Noakhali: 15 ऑगस्ट 1947 रोजी राजधानी दिल्ली येथे स्वातंत्र्य मिळाल्याचा आनंद साजरा केला जात होता. देशातील सर्व लहान-मोठे नेते आणि नागरिक गोळा झाले होते. जे दिल्लीत पोहोचू शकले नाहीत त्यांनी आपापल्या राज्यात स्वातंत्र्य दिवस साजरा केला.दरम्यान स्वातंत्र्य चळवळीतील महानायक महात्मा गांधी दिल्लीतील जल्लोषात उपस्थित नव्हते. ते दिल्लीपासून हजारो किलोमीटर दूर होते. त्यावेळी महात्मा गांधी कुठे होते? काय करत होते? असा प्रश्न आपसुकच पडला असेल. याबद्दल जाणून घेऊया.
स्वातंत्र्यदिनी बापूंचे उपोषण
पहिल्या स्वातंत्र्यदिनी महात्मा गांधी दिल्लीपासून दूर हजारो किलोमीटर अंतरावर होते. दिल्लीत आनंदाचा उत्सव साजरा करण्याऐवजी ते उपोषण करत होते. 15 ऑगस्ट 1947 रोजी बापू बंगालच्या नोआखली (आताचा बांगलादेशातील जिल्हा) मध्ये पसरलेल्या हिंदु-मुस्लिम सांप्रदायिक दंगलीला संपवण्यासाठी आणि शांततेचं आवाहन करण्यासाठी गेले होते. 9 ऑगस्ट 1947 रोजी बापू कोलकात्याला पोहोचले होते. वस्त्यांमध्ये फिरुन त्यांनी लोकांना शांततेचे आवाहन केले. तिथला हिंसाचार थांबावा यासाठी त्यांनी उपोषण सुरु केले. दुर्देवाची गोष्ट म्हणजे, स्वातंत्र्याच्या 78 व्या वर्षी बांगलादेशमध्ये पुन्हा एकदा हिंसा आणि अस्थिरता पाहायला मिळतेय. स्वातंत्र्य दिनाच्या एका रात्री 10 कोटीहून अधिक नागरिकांचे जीवन अस्थिर होते. धर्माच्या आधारे लोक विस्थापित होत होती.देशातील वातावरण ठीक करण्यासाठी बापू पर्व पाकिस्तानजवळ पोहोचले होते.
दिल्लीत आनंद साजरा करण्याऐवजी बापू कोलकातामध्ये
15 ऑगस्टच्या मध्यरात्री स्वातंत्र्य सोहळ्याला सुरुवात झाली.दिल्लीमध्ये संविधान सभेच्या बाहेर शंखनाद झाला. दिल्लीच्या आधी ब्रिटीशांची राजधानी राहिलेल्या कोलकातामध्ये हिंसाचार झाला. विवेक आणि भाऊबंधकीचे रक्षण कोलकातामध्ये झाले तर साऱ्या देशात होईल, कोलाताचे उदाहरण घेऊन संपूर्ण भारतात मानवता जागृत होईल, असा संदेश त्यावेळी बापुंनी दिला.
15 ऑगस्ट 1947 रोजी मुंबई आणि मद्रासमध्ये काय घडत होते?
15 ऑगस्ट 1947 रोजी तत्कालीन मुंबईत ब्रिटिशांनी विकसित केलेल्या ‘बॉम्बे यॉट क्लब’च्या गेटवर पोलिसांनी फलक लावला होता. भारत आता ब्रिटिशांच्या गुलामीत नसून स्वतंत्र झालाय हा स्पष्ट संदेश या कृतीतून देण्यात आला. कारण याआधी गोरे म्हणजे ब्रिटिशांशिवाय इतर कोणीही तेथे प्रवेश करू शकत नव्हते. त्याचवेळी मद्रासमधील नटराज मंदिरातून साधूंचा एक गट पितांबरा आणि इतर पवित्र वस्तू घेऊन दिल्लीला पोहोचला होता. स्वातंत्र्य दिनानिमित्त दक्षिण भारतातील प्रसिद्ध मंदिरांमध्ये देशाच्या प्रगतीसाठी विशेष प्रार्थना करण्यात येत होत्या.
महात्मा गांधींनी भारताच्या फाळणीला कडाडून केला होता विरोध
गांधी संपूर्ण वांग्मयमध्ये दिलेल्या माहितीनुसार, महात्मा गांधींनी लॉर्ड माउंटबॅटनची भारताच्या फाळणीची योजना स्वीकारण्याच्या काँग्रेसच्या तयारीलाही कडाडून विरोध केला होता. 1 जून 1947 रोजी त्यांनी मनू गांधींकडे आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या होत्या, 'आज मी स्वतःला एकटा समजतो… मला वाटतं की स्वातंत्र्याच्या दिशेने पावलं उलटत चालली आहेत. त्याचे परिणाम आज लगेच दिसणार नाहीत, पण मला भारताचे चांगले भविष्य दिसत नाही. अहो भारताच्या भावी पिढी, भारताच्या फाळणीला गांधींनीही पाठिंबा दिला होता असे मला वाटू नये.
फाळणीमुळे महात्मा गांधी दिल्लीपासून दूर बंगालमध्ये होते का?
त्यानंतर 2 जून 1947 रोजी काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीला संबोधित करताना महात्मा गांधी म्हणाले, "भारताच्या फाळणीबाबत कार्यकारिणीच्या निर्णयांशी मी सहमत नाही." महात्मा गांधींनीही त्याच दिवशी पत्र लिहून निषेध व्यक्त केला होता. त्यांनी पत्रात लिहिले होते की, 'भविष्यात भारताच्या फाळणीचे माझ्यापेक्षा दु:खी कदाचित कोणीही नसेल. मी ही फाळणी चुकीची मानतो आणि म्हणून मी त्यात कधीही सहभागी होऊ शकत नाही.' कदाचित याच कारणामुळे महात्मा गांधी दिल्लीपासून दूर बंगालमधील सामान्य लोकांच्या समस्या सोडवण्यात व्यस्त होते, असे म्हटले जाते.