महात्मा गांधींचे पणतू सतीश धुपेलिया यांचे कोरोनामुळे निधन
धुपेलिया भाऊ-बहीण मणिलाल गांधी यांचे वंशज
मुंबई : राष्ट्रपिता महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांचे पणतू सतीश धुपेलिया (Satish Dhupelia) यांचे कोरोनामुळे (Corona Dies) निधन झाले आहे. वयाच्या ६६ व्या वर्षी न्यूमोनियाने ग्रस्त झालेल्या धुपेलिया यांच्यावर गेला महिनाभर इलाज सुरू होता. रुग्णालयातच त्यांना कोरोनाची लागण झाली होती.
धुपेलिया हे मूळचे दक्षिण आफ्रिकेचे रहिवासी होते. तीनच दिवसांपूर्वी त्यांचा वाढदिवस होता. त्यांचे निधन झाल्याची माहिती त्यांची बहीण उमा धुपेलिया मेस्थरी यांनी दिली आहे. धुपेलिया यांच्या पश्चात दोन बहिणी आहेत. त्यातील एका बहिणीचं नाव कीर्ती मेनन असं आहे. ती सध्या जोहान्सबर्ग येथे राहते आणि गांधी विचारधारेचा प्रसार करते.
A one page tribute to a big life and a big heart Satish Dhupelia was born on 19 November 1954, the son of Shashikant...
Posted by Uma Dhupelia-Mesthrie on Sunday, November 22, 2020
सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिलं आहे की, 'न्यूमोनियाने एक महिना ग्रस्त असलेल्या माझ्या भावाचं निधन झां आहे. उपचारादरम्यान रुग्णालयात कोरोनाची लागण झाली आहे. हृदयविकाराचा झटका आला आणि त्यामध्ये त्यांच निधन झालं. '
धुपेलिया भाऊ-बहीण मणिलाल गांधी यांचे वंशज आहेत. मणिलाल यांनी दक्षिण आफ्रिकेत राहून गांधीवादाचा प्रचार केला होता. सतीश धुपेलिया हे माध्यमकर्मी म्हणून कार्यरत होते. व्हिडीओग्राफर आणि फोटोग्राफर म्हणून काम करताना त्यांनी गांधीवादाचा प्रसार केला. गांधी विकास ट्रस्टच्या माध्यमातून ते काम करत होते.