मुंबई : Mahindra Scorpio-N SUV: डिसेंबर 2022 पर्यंत ऑल न्यू स्कॉर्पिओ एनचे 20 हजाराहून अधिक युनिट्सची डिलिवरी करण्यात येणार आहे. ज्यामध्ये Z8L वेरिएंटला प्राधान्य देण्यात येणार आहे. महिंद्रा कंपनीच्या वतीने ऑगस्ट 2022 च्या अखेरपर्यंत ग्राहकांना डिलिवरीच्या तारखेबाबत सूचित करणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Mahindra Scorpio-N SUV:  महिंद्रा एँड महिंद्रा लिमिटेड(M&M)चा शेअरने 7 टक्क्यांहून अधिक तेजी नोंदवली आहे. BSE वर M&M च्या शेअर 7 टक्क्यांनी वाढून 52 आठवड्यांच्या नवीन उच्चांकांवर पोहचला आहे. 


M&M ने शनिवारी 30 मिनिटात 1 लाख Scorpio-N बुकिंगचा रेकॉंर्ड बनवला होता. यामुळे आज महिंद्रा एँड महिंद्राच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात तेजी नोंदवली गेली. 


Scorpio-N या SUV कारची लोकांमध्ये मोठी क्रेज असल्याचे दिसून आले. म्हणून फक्त अर्ध्या तासात 1 लाख युनिट कारची बुकिंग कंपनीला मिळाली. यामुळे कंपनीच्या शेअर्ससाठी ब्रोकरेज हाऊसेसने गुंतवणूकीसाठीचे लक्ष्य वाढवून 1450 रुपये करण्यात आले आहे.


Mahindra Scorpio-N SUV च्या बुकिंगनंतर ब्रोकरेज हाऊसेसचा सल्ला
M&M कंपनीच्या Scorpio-N SUV ला मिळालेल्या मोठ्या प्रतिसादानंतर ब्रोकरेज हाऊस एक्सिस सेक्योरिटीजने (Axis Securities) म्हटले की,  अत्यंत स्पर्धात्मक युगात कंपनीचे प्रयोग यशस्वी होत आहेत. M&M ची या क्षेत्रात मोठी उलाढाल सुरूच आहे. कंपनीने एसयुव्हीवर आपले लक्ष्य केंद्रीत केले आहे. इलेक्ट्रीक कार निर्मितीमध्ये बाजारात आपला दबदबा निर्माण करण्याची कंपनी तयारी करीत आहे.


ब्रोकरेज हाऊसेसने M&M च्या शेअरमध्ये गुंतवणूकीचा सल्ला दिला आहे. प्रति शेअर लक्ष्य 1450 रुपये इतके ठेवण्यात आहे. सध्या हा शेअर 1,233.55 रुपयांवर ट्रेड करीत आहे. ब्रोकरेजने दिलेले लक्ष्य पूर्ण झाल्यास गुंतवणूकदारांना 24 टक्क्यांचा परतावा मिळू शकतो.