Maid Mixes Urine In Food: उत्तर प्रदेशच्या गाझियाबाद येथे एक धक्कादायक व किळसवाणी घटना उघडकीस आली आहे. एका घरात काम करणाऱ्या मदतनीस महिलेने जेवण बनवताना असं काही केलं की संपूर्ण कुटुंब आजारी पडलं. आठ वर्षांपासून एक महिला या घरात जेवण बनवण्याचे काम करत होती. ती सर्व कुटुंबासाठी जेवण बनवत होती. मात्र जेवण बनवत असताना ती त्यात लघवी मिसळायची. या किळसवाण्या व अंगावर काटा येणाऱ्या घटनेचा खुलासा तेव्हा झाला जेव्हा घरमालकाने स्वयंपाकघरात सीसीटिव्ही लावले. महिलेच्या या कृत्यामुळं हळूहळू घरातील सर्व सदस्य आजारी पडू लागले होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गाझियाबाद येथील एका सोसायटीत राहणाऱ्या रिअल इस्टेट व्यापारी आणि त्याचे कुटुंब गेल्या महिन्याभरापासून गंभीर आजाराने त्रस्त होते. कुटुंबातील लोक पोटदुखी आणि लिव्हरच्या आजाराने ग्रस्त होते. सुरुवातीला साधारण इन्फेक्सन असू शकेल असं समजून डॉक्टरांकडून उपचार घेतले. मात्र त्यात काहीच सुधारणा झाली नाही. जेव्हा प्रकृती अधिक खालावत गेली तेव्हा जेवणातच काहीतरी गडबड असावी, अशी शंका त्यांना आली. त्यानंतर त्यांनी स्वयंपाकघर आणि अन्य ठिकाणी सीसीटिव्ही कॅमेरा लावले. जेणेकरुन जेवणाच्या तयारीवर लक्ष ठेवण्यात येईल. 


सीसीटिव्ही फुटेजमध्ये जे दिसलं ते फारच धक्कादायक होते. घरात काम करणारी मदतनीस रीना जेवण बनवत असताना त्यात लघवी मिसळत होती. हे किळसवाणं कृत्यू पाहून कुटुंबीयांना एकच धक्का बसला होता. पीडित कुटुंबाने लगेचच तिच्याविरोधात गुन्हा दाखल केला. पीडित कुटुंबाच्या तक्रारीनंतर तिला अटक करण्यात आली आहे. महिला 8 वर्षांपासून त्यांच्या घरी काम करत होती. गेल्या काही महिन्यांपासून कुटुंबातील लोक यकृताच्या आजाराने ग्रस्त होते. सुरुवातीला इन्फेक्शन समजून डॉक्टरांना दाखवण्यात आले होते. मात्र काहीच फरक पडला नाही. 


पोलिसांनी महिला मदतनीसाला अटक केली आहे. मदतनीस महिला लघवी एका भांड्यात जमा करुन ते जेवणात टाकत होती. या प्रकरणाचा अधिक तपास करण्यात येत आहे. पण या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.