Parle-G Ice Cream Recipe:  उन्हाळा (Summer) सुरु झालाय, उन्हाच्या झळांनी अंगाची लाहीलाही होतेय. उन्हाळ्यात थंड पदार्थ खाण्याकडे सर्वांचा कल असतो. आईस्क्रीम, थंड पेय सर्वाना खावीशी वाटते. कडाक्याच्या उन्हात घशाला कोरड पडते आणि आपल्याला सतत थंड काहीतरी खावसं वाटतं. उन्हाळ्यात आईसक्रीम ( Ice Cream) खायची मजा काही वेगळीच असते. घरच्या घरी सोप्या पद्धतीत आईसक्रीम बनवण्याची सोपी पद्धत जाणून घेऊया, आणि ही आईस्क्रीम बनवण्यासाठी तुम्हाला फक्त10 रुपये खर्च करावे लागणार आहेत. बाकी सामान किचनमध्ये असेलच.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज आपण ग्लुकोज बिस्किट्स आणि दुध या साहित्यांचा वापर करून आईस्क्रीम बनवणार आहोत. (Make ice cream for just 10 rupees less ingredient parle g ice cream recipe for midnight sweet cravings)


ग्लुकोज बिस्कीट आईस्क्रीम बनवण्यासाठी लागणारं साहित्य


ग्लुकोज बिस्कीट (Parle-G), दूध, पिनट बटर, पिठी साखर,मिल्क पावडर, चॉको चिप्स, बदाम, कृती


मिक्सरच्या भांड्यात ग्लुकोज बिस्किटांचे तुकडे बारीक करून घ्या. आता ही पावडर बाऊलमध्ये काढून घ्या.  त्यात दूध घाला आणि मिश्रण एकजीव करून घ्या. आता या मिश्रणात पीनट बटर, चॉको चिप्स, मिल्क पावडर, बदामाचे तुकडे पिठी साखर चवीनुसार घाला आणि हे सर्व मिश्रण नीट एकत्र करा.  


बाजारात अनेक प्रकारचे आईस्क्रीम मोल्ड मिळतात. त्यातील तुमच्या आवडीचे मोल्ड घ्या. यात हे तयार मिश्रण घाला. त्यावर चॉको चिप्स आणि बदामाचे तुकडे घाला आईस्क्रीम स्टिक लावून फ्रिजरमध्ये सेट करायला ठेऊन द्या.  ५-६ तास  सेट करून घ्या ग्लुकोजचं गारेगार आईस्क्रीम तयार आहे . चॉकोलेट सिरप घालून गार्निश करा. १० रुपयांच्या ग्लुकोज बिस्किटांमध्ये चविष्ट आईस्क्रीम तयार.


भारतीय लग्नांमध्ये अनेक हटके गोष्टी पहायला मिळतात. लग्न म्हटलं की मजा, धमाल, मस्ती आलीच. मित्र-मंडळी, कुटुंबीय एकत्र येऊन लग्न अविस्मरणीय बनवण्यास मदत करतात. लग्नातील अनेक खास व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. असाच एक लग्नातील मजेशीर व्हिडीओ सध्या समोर आला आहे.


सोशल मीडियावर सध्या एका लग्नातील मजेशीर व्हिडीओ समोर आला आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये दिसतंय की, लग्न सोहळा सुरु असून नवरी नवरदेव मंचावर बसलेले दिसत आहेत. स्टेजवर काही मुलीही दिसत आहे. मुली नवरदेवाला रसगुल्ला भरवण्यासाठी आलेल्या पहायला मिळतायेत. मुलगी तिचा हात पकडून रसगुल्ला खायला लागतो तेवढ्यात मुलगीच रसगुल्ला खाण्यासाठी पुढे येते आणि रसगुल्ला खाते. ही घटना पाहून सर्वच थक्क होतात.


पाहा Video - 



व्हिडीओमध्ये मुलीने नक्की काय केलं असा प्रश्न सर्वांना पडला असून यावर सोशल मीडियावर चांगलीच मजा घेतली जात आहे. हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत असून व्हिडीओवर अनेक मजेशीर कमेंटही पहायला मिळत आहे. Ashiq Billota Official नावाच्या इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. अगदी काही वेळात हा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसून आला.