नवी दिल्ली : गेल्या कित्येक वर्षापासून गूढतेच्या आवारणाखाली लपलेलं माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्रींच्या मृत्यूचं कारण अखेर जनतेसमोर येण्याची शक्यता आहे. केंद्रीय माहिती आयोगाने चौकशी करणाऱ्या तत्कालीन राजनारायण समितीचा अहवाल खुला करण्याचे निर्देश दिलेत. पंतप्रधान कार्यालय, परदेश मंत्रालय आणि केंद्रीय गृहमंत्रालयाला हे निर्देश देण्यात आलेत. ११ जानेवारी १९६६ या दिवशी ताश्कंद इथे लालबहादूर शास्त्री यांचा गूढ मृत्यू झाला होता. पाकिस्तानचे अध्यक्ष मोहम्मद अयूब खान यांच्याशी भारत पाकिस्तान युद्धानंतर झालेल्या करारावर स्वाक्षऱ्या केल्यावर अवघ्या काही तासांत शास्त्रींचा मृत्यू झाला होता. तसंच या संदर्भातल्या दस्तावेजांची सूचीही जनतेसमोर आणण्याचे निर्देश केंद्रीय माहिती आयुक्त श्रीधर आचार्य़ुलू यांनी दिलेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याबाबतची माहिती जनतेसमोर येणं गरजेचं आहे. शास्त्रींचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे जाणून घेण्याचा अधिकार जनतेला आहे असं आयुक्त आचार्युलू यांनी म्हटलंय. मृत्यूनंतर शास्त्रींचं शव भारतात आणलं की ताश्कंद इथेच त्यावर अंत्यसंस्कार झाले हे माहिती अधिकारात मागवण्यात आली होतं, त्यानंतर हे निर्देश देण्यात आले.