मुंबई : पॅनकार्ड आपल्यासाठी किती महत्त्वाचं आहे याचा अंदाज आपल्या पैशांचे व्यवहार करताना येतोच. बॅंक अकाऊंट उघडण्यापासून इनकम टॅक्स रिटर्न फाइल करण्यापर्यंत सर्व काम पॅन कार्ड शिवाय होत नाहीत.  पॅन कार्ड मिळवण्याची प्रक्रीया बऱ्याचदा आपल्याला किचकट वाटते. पॅन कार्ड बनविण्यासाठी हजारो रुपयेही बऱ्याच ठिकाणी घेतले जातात. पण आम्ही तुम्हाला एक सोपा मार्ग सांगणार आहोत. जर तुम्ही ऑनलाईन पॅन कार्ड बनवलात तर तुम्हाला केवळ 101 रुपयेच मोजावे लागतील.


कसं बनवालं पॅन कार्ड 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 https://www.onlineservices.nsdl.com/paam/endUserRegisterContact.html किंवाhttps://www.utiitsl.com/UTIITSL_SITE/pan/index.html या लिंक वर क्लिक करा. या दोन साईटपैकी अन्य कोणतीही साईट अधिकृत नाहीयं. 


एनएसडीएल साइटवर ऑनलाईन ई-केवायसी करुन फिजीकल पॅन कार्ड बनविणाऱ्या भारतीय नागरिकांसाठी केवळ 101 रुपये खर्च येतो. जर एनएसडीएलकडून हे डॉक्यूमेंट तुम्हाला पोस्ट किंवा कुरियरने हवे असल्यास याची फिस 107 रुपये होतात. विदेशात राहणाऱ्या भारतीयांसाठी ही फिस 1011 आणि 1017 रुपये होते. 


असे करा अप्लाय


 UTIITSL site वर https://www.utiitsl.com/UTIITSL_SITE/pan/index.html वर जाऊन अप्लाय एज अॅन इंडियन सिटीजन किंवा एनआरआय सेगमेंटमध्ये जाऊन अप्लाय फॉर न्यू पॅन कार्डवर क्लिक करा. 


इथे तुम्हा फॉर्म 49 A मिळेल. यामध्ये तुम्हाला सर्व डिटेल्स भरावी लागेल. 


यानंतर इतर महत्त्वाच्या कागदपत्रांची प्रत जोडून नंतर पेमेंट करावी लागेल. इतर कागदपत्र जोडण्यासाठी https://www.utiitsl.com/UTIITSL_SITE/forms/DocumentsForPAN.pdf या लिंक वर क्लिक करा. 


ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी आणि फिस पेमेंट करण्यासाठी https://www.myutiitsl.com/PAN_ONLINE/IPGguidelines.html वर माहिती मिळू शकेल आणि https://www.utiitsl.com/UTIITSL_SITE/forms/UTIITSL%20-%20PAN%20Application%20Fees%20w_e_f_%2016th%20Jun%202018.pdf यावर फिस भरू शकतात.