How To Make Makhana Chat at Home: चाट खाणं हे आपल्यापैंकी सगळ्यांनाच आवडतं. आपल्याला घरीही चाट बनवायला (Chat) आवडते. मग तो चाटमधला कुठलाही प्रकार असो तो आपल्याला खायला आणि बनवायला आवडतोच आवडतो. घरच्या घरी लज्जतदार पाणीपुरी खाण्याची आणि बनवण्याची क्रेझ (Pani Puri) ही सर्वांनाच आहे. आपल्या घरी कोणी पाहूणे आले की आपण हमखास चाट बनवतो. त्यामुळे पाणीपुरी, सेवपुरी, दहीपुरी, भेळ अशा पदार्थांची रेलचेल ही असते. परंतु अनेकदा आपल्याला हेही पदार्थ (Mumbai Chat Recipe at Home) खाण्याचा कंटाळा येतो. तेव्हा आपल्यालाही काहीतरी नवं ट्राय करण्याची इच्छा असते. तुम्ही कधी मखाना चाटबद्दल ऐकले आहे का? नसेल ऐकले तर तुम्ही हा हटके प्रकार घरच्या घरीही ट्राय करू शकता. हा पदार्थ बनवायला खूप सोप्पा असतो. तेव्हा या लेखातून जाणून घेऊया मखाना चाटची रेसिपी कशी कराल तयार? (Makhana Chat Recipe How to make instant and fast makhana chat read the full recipe)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मखाना चाट हा एक पौष्टिक पदार्थ आहे. त्यातून यामध्ये असणाऱ्या ड्राय फ्रुट्समुळे तुम्हाला अनेक पोषक घटक मिळतात. हा मखाना चाट तुम्हाला वजन (Weight Loss) कमी करण्यास मदत करतो. तेव्हा चविष्ट पदार्थासोबत यातून तुम्हाला अनेक आरोग्यदायी फायदे मिळतील. डायबेटिज (Diebetes) आणि ब्लड प्रेशर (Blood Pressure) असणाऱ्या पेशंट्ससाठीही हा पदार्थ उपयुक्त ठरतो. त्यामुळे तुमच्यासाठी हा पदार्थ अत्यंत उपयुक्त असा आहे. खासकरून तरूणपिढीसाठी हा पदार्थ गुणकारी ठरू शकतं. जंक फूड खाण्यापेक्षा तरूणपिढीनं ही या पदार्थाचे सेवन करू शकतात. तुमच्यासाठी हा पदार्थ अत्यंत टेस्टी आणि आरोग्यदायी आहे. 


याची रेसिपी काय आहे हे जाणून घ्या 


हा पदार्थ तयार करण्यासाठी तुम्हाला खालील काही गोष्टींची गरज लागेल. यासाठी 1 कप मखाना घ्या, 1 कप दही, 1 उकडलेला बटाटा, 1 टॉमटो कापलेला, 1/2 खीरा, 1/4 टेबल स्पून काळी मिरची, 1 टेबलस्पून कोथिंबीर, 2 टेबल स्पून चिंच्याची चटणी, मीठ चवीनूसार आणि 1 टेबल स्पून लिंबाचा रस 


आणि मखाना चाट तयार 


कृती 1 -  मखाना चाट तयार करण्यासाठी सर्वप्रथम एका बाऊलमध्ये उकडलेले बटाटे घ्या. त्यात कापलेले टॉमेटो टाका आणि कोंथिबीर टाका मग त्यानंतर एका बाऊलमध्ये दही मिक्स करा आणि मग त्याला व्यवस्थित ढवळा त्यात थोडं आवश्यकेनुसार पाणी मिसळा. 


कृती 2  - दुसऱ्या बाऊलमध्ये मखाना घ्या आणि मंद आचेवर 4-5 मिनिटे तर चांगले तळून घ्या. थंड झाल्यावर त्याचे तुकडे करा आणि मोठ्या बाऊलमध्ये काजू, बटाटे, टॉमेटो, काकडी वैगेरे मिश्रण एकजीव करा त्यात काळी मिरी पावडर आणि चिंचेची चटणी टाका आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करा. यावर तुम्ही लिंबाचा रस आणि कोंथिंबीर घालून मखाना चाट सर्व्ह करा.