मुंबई : दोन कट्टर विरोधक एकमेकांसमोर आल्यानंतर नेमकी काय गंमत होते याचा विचार आपण न करणंच बरं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणजे परस्परांचे राजकीय विरोधक आहेत. शांती निकेतनच्या दीक्षांत समारंभाला हजर राहण्यासाठी मोदी आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांचं आगमन झालं. त्यांचं स्वागत करण्यासाठी ममता बॅनर्जी तिथं उपस्थित होत्या. मोदींनी हात जोडून त्यांना नमस्कार केल्यानंतर ममतांनीही हात जोडले. पण चेहरा अगदी निर्विकार होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दीक्षात समारंभाला जाण्यासाठी प्रथेप्रमाणं त्यांची छोटी मिरवणूक काढण्यात आली. त्यावेळी राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी अगदी मोदींच्या समोर चुकीच्या जागी उभे राहिले. तेव्हा मुख्यमंत्री असलेल्या ममतांनी प्रेमानं का होईना, पण त्यांना चक्क ढकललं आणि मोदींना चेहरा सगळ्यांना दिसेल, याची काळजी घेतली. हा गंमतीशीर प्रकार पाहून सर्वांनाच सुखद धक्का बसला आहे. 



तसेच या दौऱ्याच्यावेळी आणखी एक मजेशीर दृश्य घडले. मोदी शांती निकेतन येथे पोहोचले तेव्हा स्वागतासाठी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पोहचू शकल्या नव्हत्या. राज्यपाल केशरीनाथ त्रिपाठी यांनी मोदींचे स्वागत केलं. ममता बॅनर्जी मोदींना घाईत येताना दिसल्या तेव्हा मोदींनी त्यांना रस्ता खराब असल्याच सांगितलं.