कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना एका NGO द्वारा आयोजित कार्यक्रमात सहभागी होण्याची परवानगी न मिळाल्याने त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. पश्चिम बंगाल सरकारला विदेश मंत्रालयाचे एक पत्र  मिळाल्यानंतर वादाला तोंड फुटले आहे. या फत्रात म्हटले आहे की, या कार्यक्रमात राज्याच्या मुख्यमंत्र्याची उपस्थिती अनुकुल नाही. हा कार्यक्रम 6 आणि 7 ऑक्टोबर रोम(इटली) मध्ये होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कार्यक्रमाची रुपरेषा
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांना सेंट एगिडियो समाजाच्या वतीने इटलीत आमंत्रित करण्यात आले होते. समाज सेवेसाठी समर्पित एक कॅथलिक संघ आंतरराष्ट्रीय कार्यक्रमाचे आयोजन करणार आहे. या कार्यक्रमात 'पीपुल्स ऐज ब्रदर्स, फ्युचर अर्थ' या विषयावर चर्चा होणार आहे. कार्यक्रमात पोप फ्रांसिस, विश्वव्यापी कुलपती बार्थोलोम्यू फर्स्ट आणि जर्मन चांसलर एंजेला मर्केलसुद्धा उपस्थित राहण्याची शक्यता आहे.


ममतांचा संताप
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी निमंत्रण स्विकार केले. त्यानंतर निश्चित झाले की, भवानीपूरच्या पोटनिवडणूकांनंतर त्या रोम येथे जातील. ते रोम जाण्याची तयारी करीत होत्या. परंतु अचानक केंद्र सरकारच्या या पत्रानंतर सर्व नियोजन कोलमडले. भवानीपूरमध्ये एका जनसभेला संबोधित करताना त्या म्हटल्या की, पंतप्रधान परदेशात जाऊ शकतात. तर मला परदेशातील कार्यक्रमात सहभागी होण्याची परवानगी का नाकारण्यात आली? फक्त तिरस्काराच्या भावनेतून मला रोखण्यात आले आहे.