कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या समोर काही लोकांनी जय श्री रामच्या घोषणा दिल्याने त्या चांगल्याच भडकल्या. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा ताफा परगना जिल्ह्यातून जास असताना काही लोकांनी जय श्री रामच्या घोषणा दिल्या. तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख लोकसभा निवडणुकीत आपल्या कार्यकर्त्यांवर झालेल्या हिंसेच्या आरोपामुळे उपोषणासाठी नैहाटी येथे जात होत्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये काही लोकं जय श्री रामच्या घोषणा देत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान तृणमुल काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांममध्ये हिंसेच्या अनेक घटना समोर आल्या. ममता बॅनर्जींचा ताफा जेथून जात होता तो भाजपचे निवडून आलेले खासदार अर्जुन सिंह यांचा गड मानला जातो. सिंह यांनी येथून तृणमूल काँग्रेसच्या दिनेश त्रिवेदी यांचा पराभव केला.



जय श्री रामच्या घोषणा दिल्यानंतर ममता बॅनर्जी गाडीतून बाहेर आल्या. आपल्या सोबत असलेल्या सुरक्षा रक्षकांना त्या लोकांची नावे लिहून घेण्य़ास सांगितली.


मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आपल्या गाडीमध्ये गेल्यानंतर पुन्हा घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर पुन्हा त्या आपल्या गाडीमधून बाहेर आल्या.