मुंबई : अभिनेत्री सार्वजनिक जीवनात वावरताना काळजी घेतात. कारण त्यांचा कोण गैरफायदा घेईल हे माहित नसतं. असाच एक प्रकार समोर आला आहे. साऊथ फिल्म इंडस्ट्रीतून ही बातमी पुढे आली आहे. एका अज्ञात व्यक्तीने एका प्रसिद्ध अभिनेत्रीची बदनामी करण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी त्याचा डाव हाणून पाडला आणि त्याला अटक केली. या आरोपीने अभिनेत्रीच्या फोटोसोबत छेडछाड करत ते सोशल मीडियावर अपलोड केले होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंडिरी राम वेंकट वीरराजू असे आरोपीचे नाव आहे. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, त्याचे वय 30 वर्षे असल्याचे सांगण्यात आले आहे. आरोपीने 'Sairavi267' नावाचे बनावट ट्विटर अकाउंट तयार केले होते.  पंडिरी राम अभिनेत्रीच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवत असे आणि नंतर येथून मिळालेल्या माहितीचा विपर्यास करून फेक अकाउंटवर शेअर करायचा.


आरोपीने अभिनेत्रीचे फोटो एडिट करून अश्लील शब्दात सोशल मीडियावर व्हायरल केले. पण या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. त्याच्यावर सायबर गुन्ह्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलिसांनी केलेल्या वेळीच कारवाईमुळे अभिनेत्रीची यातून सुटका झाली. आरोपीने हे का केलं याची माहिती पुढे आली नाही. पण त्याचा डाव पूर्ण होण्याआधीच त्याला अटक करण्यात आली.