मुंबई: आतापर्यंत तुम्ही पुराच्या पाण्यातून वाचण्यासाठी किंवा रेस्क्यूसाठी जेसीबी वापरल्याचं ऐकलं असेल. मात्र एक भावुक करणार व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चक्क तरुणाला भर पावसात जेसीबीचा आधार मिळाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुसळधार पावसात बाईकवरून जाणाऱ्या तरुणाला जेसीबीने आसरा दिला आहे. पावासापासून वाचण्यासाठी हा जो जुगाड करण्यात आला त्याचं सोशल मीडियावर खूप कौतुक होत आहे. इतकच नाही तर हा जुगाडाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल देखील झाला आहे. 



हा व्हिडिओ आयएएस अधिकारी अवनीश शरण यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ पोस्ट करताना कॅप्शन लिहिले की, 'जेव्हा शक्य असेल तेव्हा मदत करा, हे नेहमीच शक्य आहे.' या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहु शकता की रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दुचाकीस्वार मुसळधार पावसापासून वाचण्यासाठी आसरा शोधत होता.


या बाईकस्वाराच्या जवळपास एक जेसीबी मशीन होतं. ज्यांच्या ड्रायव्हरने दुचाकीस्वारास मदत करण्यासाठी आणि भिजण्यापासून वाचविण्यासाठी एक जुगाड सुचला. जेसीबी चालकाने या जुगाडने आपल्या मशीनची छत्री बनविली आणि दुचाकीस्वाराला भिजण्यापासून वाचवले.