कोलकाता : कोलकात्यामध्ये एका व्यक्तीचा मेट्रोच्या दरवाजात अडकून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दुर्घटना होण्यापेक्षा उशीर झालेला बरा, असे नेहमी म्हटले जाते. पण ट्रेन, मेट्रोमध्ये प्रवास करणारे प्रवासी नेहमीच हे विसरतात. काही सेकंदांच्या अंतरामुळे थेट मृत्यू ओढवतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शनिवारी संध्याकाळी ६. ४० च्या सुमारास ही दुर्घटना घडली. कोलकात्यामध्ये मेट्रोमध्ये चढत असताना एका माणसाचा हात मेट्रोच्या दरवाजात अडकला आणि तो बाहेरच राहिला. मेट्रो पुढे गेली. पुढच्या स्टेशनवर मेट्रो थांबली, त्यावेळी तो माणूस बेशुद्ध झाला होता. त्याला रुग्णालयात नेण्यात आले. पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. ज्यावेळी हा माणूस मेट्रोमध्ये अडकला, त्यावेळी स्टेशनवरच्या लोकांनी आरडाओरडा केला पण, तोपर्यंत मेट्रोने वेग घेतला होता.


मेट्रोच्या दरवाजांवर सेन्सर लावलेला असतो. दरवाजे बंद होण्याआधी लाईट आणि आवाजही येतो. सेन्सर वाजत असला तरीही लोक मेट्रोत चढण्यासाठी घाई करतात. याच घाईमुळे कधी जीवही जातो. त्यामुळे एखादी मेट्रो गेली तर दुसरी येते मात्र हे जीव पुन्हा येत नाही हे लक्षात ठेवून सर्वांनी प्रवास करताना सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे.