क्षुल्लक कारणावरुन वाद, तरुणाच्या गुप्तांगावर वार केल्याचा दावा, तर गर्भवती पत्नीला...
Man Beaten After Petty Dispute: क्षुल्लक वादातून झालेल्या मारहाणीतून एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. या झटापटीत त्याच्या गुप्तांगाला मार बसला आहे.
Crime News In Marathi: क्षुल्लक कारणावरुन झालेल्या वादातून एका युवकाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. ३२ वर्षीय तरुणाचे गुप्तांग कापून त्याच्या गर्भवती पत्नीलाही मारहाण करण्यात आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मारहाण झालेल्या तरुणाचे नाव सतेंद्र कुमार असे असून त्यांने या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतलं आहे.
पीडित तरुणाने दिलेल्या तक्रारीनुसार आरोपींनी त्याच्या गुप्तांगावर हल्ला केला होताय त्यांतर त्याची चार महिन्याची गर्भवती पत्नीलाही कुर्हाडीने मारहाण करण्यात आली आहे. घटनेच्या दोन दिवसांनंतर 16 जून रोजी आरोपी विक्रम सिंह ठाकुर आणि भुरे ठाकूर या दोघांनी पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. उत्तर प्रदेशातील एटा परिसरात ही घटना घडली असून यामुळं परिसरातून संताप व्यक्त होत आहे.
सतेंद्र कुमार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, 14 जून रोजी दोन्ही आरोपींनी एक झाड कापून माझ्या जमिनीवर ठेवले होते. यावर मी आक्षेप घेत झाड तिथून हटवण्यास सांगितले. याचा राग मनात ठेवून त्यांनी मला जातिवाचक शिवीगाळ केली. नंतर विक्रम आणि भूरे या दोघांनी मला पकडून ठेवले व मला अमानुष मारहाण केली. विक्रमने खिशातून चाकू काढून माझ्या गुप्तांगावर वार केले, असं त्याने तक्रारीत नमूद केलं आहे. पीडीत तरुणाने दिलेल्या माहितीनुसार, डॉक्टरांनी त्याच्या जखमेवर 12 टाके लावावे लागले आहेत.
आरोपींनी सतेंद्रच्या पत्नीवरही हल्ला केल्याचा आरोप त्याने केला आहे. आरोपी मला मारहाण करत असताना मी मदतीसाठी आरडा-ओरडा करत होतो. तेव्हा माझी हाक ऐकून माझी पत्नी धावत आली होती. तेव्हा भूरेने तिच्यावर कुऱ्हाडीने हल्ला केला. मात्र, सुदैवाने तिने वार चुकवला पण तिच्या मनगटावर मोठी जखम झाली आहे. आम्ही तिथून पळून गेल्यानंतरही आरोपींनी आमचा पाठलाग केला. ते आमच्या घरात घुसले व आम्हाला पुन्हा मारहाण करण्यास सुरुवात केली.
सतेंद्र यांच्या पत्नीनेही गंभीर आरोप केले आहेत. आम्ही पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर आरोपीच्या नातेवाईकांनी तक्रार मागे घेण्यासाठी आम्हाला धमकावत आहेत. मी चार महिन्यांची गर्भवती आहे, असा दावा तिने केला आहे.
डीएसपी विक्रांत द्विवेदी यांनी या प्रकरणात मात्र सतेंद्रचे आरोप फेटाळले आहेत. पीडित तरुणाच्या गुप्तांगावर चाकूने वार केल्याचा आरोप चुकीचा आहे. मारहाणीदरम्यान त्याच्या गुप्तांगाला मार लागला आहे. मात्र, गंभीर नसल्याचे वैद्यकिय अहवालात सांगितलं आहे. या सर्व प्रकरणाचा तपास सुरू आहे.