तरुणीने Video Call वर कपडे काढण्यास सुरुवात करताच बापासमोर बेशुद्ध पडला तरुण; अन् नंतर...
Scam Call On Whatsapp: वडिलांबरोबर त्यांच्या कार्यालयामध्ये बसलेला असतानाच हा फोन आला. त्याने फोन उचलला मात्र त्यानंतर जे काही घडलं त्याबद्दल तक्रार करण्यासाठी त्याच्या वडिलांना थेट पोलिस स्टेशनमध्ये जावं लागलं.
Whatsapp Scam Call: आधी त्या दोघांची व्हिडीओ कॉलवरुन मैत्री झाली. त्यानंतर मात्र तिने त्याला फसवलं आणि ते ही सेक्सटॉर्शन प्रकरणामध्ये. हा सारा प्रकार घडला नवी दिल्लीमधील गुरुग्राम येथील एका 25 वर्षीय तरुणाबरोबरच. हा तरुण निवृत्त न्यायाधिशाचा मुलगा आहे. आपल्या वडिलांबरोबर त्यांच्या ऑफिसमध्ये बसलेला असतानाच त्याला व्हॉट्सअपवर एक व्हिडीओ कॉल आला. समोर काही दिवसांपूर्वीच ओळख झालेली एक तरुणी होती. मात्र कॉल रिसिव्ह केल्यानंतर ही तरुणी कॅमेरासमोर स्वत:चे कपडे उतरवत होती. वडिलांच्या बाजूला बसलेला असतानाच असा कॉल आल्याने या मुलाला काय करावं कळेना. तो एवढा घाबरला की बेशुद्ध पडला. त्याच्या हृदयाचे ठोके वाढले आणि त्याला थेट रुग्णालयामध्ये दाखल करावं लागलं. यासंदर्भातील माहिती पोलिसांना या निवृत्त न्यायाधिशांनीच दिली आहे.
नक्की घडलं काय?
या निवृत्त न्यायाधिशांनी पोलिसांकडे दाखल केलेल्या लेखी रिपोर्टमध्ये, हा कॉल सकाळी साडेनऊ वाजता आला होता. मी आणि माझा मुलगा सेक्टर 17 मधील माझ्या ऑफिसमध्ये बसलो होतो तेव्हाच कॉल आला होता. कॉल आला तेव्हा समोर एक मुलगी उभी असल्याचं दिसलं. ही मुलगी तिच्या शरीरावरील कपडे काढत होती. समोरचं दृष्य पाहून माझा मुलगा घाबरुन खाली पडला आणि मीच हा कॉल कट केला, असं या निवृत्त न्यायाधिशांनी पोलिसांकडे दिलेल्या लेखी तक्रारीत म्हटलं आहे.
कॉल कट झाल्यानंतर धमक्या
कॉल कट केल्यानंतर व्हॉट्सअपवर पैशांची मागणी करणारा एक मेसेज आला. पैशांची मागणी पूर्ण केली नाही तर अश्लील फोटो इन्स्ताग्रामवर आणि फेसबुकवर पोस्ट करुन व्हायरल करण्याची धमकी समोरुन देण्यात आली. "काही असामाजिक तत्व माझी प्रतिमा मलिन करण्यासाठी आणि पैसे मिळवण्यासाठी माझा मोबाईल क्रमांक हॅक करु शकतात," अशी भीतीही या निवृत्त न्यायाधिशांनी व्यक्त केली आहे.
अशाप्रकारे फसवणूक झाल्यास काय करावं?
असा प्रकार कोणाबरोबरही घडू शकतो. मात्र असं घडलं तर घाबरुन जाण्याचं कारण नाही. सेक्सटॉर्शनच्या माध्यमातून फसवणूक करणारे लोक अशाचप्रकारे लोकांना अडकवतात. असं काही घडलं तर जवळच्या पोलिस स्टेशनला जाऊन माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत कलम 67 ए आणि आयपीसी कलम 292 अंतर्गत अज्ञात आरोपींविरोधात तक्रार दाखल करा. या प्रकरणामध्ये या निवृत्त न्यायाधिशांनीही सेक्टर 18 मधील पोलिस स्टेशनमध्ये या अज्ञात लोकांविरोधात तक्रार दाखल केली. या प्रकरणामध्ये पोलिसांनी अद्याप कोणालीही अटक केलेली नाही. व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून केली जाणारी फसवणूक काही नवीन नाही. सोशल मीडियावरुन अशाप्रकारची फसवणूक आता समान्य बाब झाली आहे. पैसे कमवण्याच्या हेतूने अशी फसवणूक केली जाते. अशा प्रकरणांना घाबरुन लोक तक्रार करता नाहीत आणि फसवणूक करणाऱ्यांचं फावतं.