पटना : पटनातून एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. अनैतिक संबंधांबद्दल आरोप करणाऱ्या पत्नीला पतीने चालत्या ट्रेनसमोर धक्का देऊन तिची हत्या केली. पटना शहरातील गुजलजारबाग रेल्वे स्टेशनच्या आसपास ओव्हर ब्रिजजवळ ही दुर्घटना घडली.


निर्दयीपणे काटा काढला


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनैतिक संबंधांचा आरोप केल्याने पतीने आपल्या पत्नीचा असा निर्दयीपणे काटा काढला. आरोपी सुनील प्रसादच्या पत्नीला त्याचा अनैतिक संबंधांबद्दल कळले होते. त्यामुळेच ती वारंवार त्याला विरोध करत होती. यामुळे रागवलेल्या सुनीलने बोलण्याच्या नादात तिला रेल्वे ट्रकजवळ आणले आणि समोरून वेगात येणाऱ्या ट्रेनसमोर तिला धक्का दिला. या दुर्घटनेत तिचा घटनास्थळीच अंत झाला. या घटनेनंतर तेथे उपस्थित लोकांनी आरोपी सुनिलला पकडले आणि जबरदस्त मारहाण केली. त्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. 


कठोरातील कठोर शिक्षा होण्याची मागणी


पटना शहरातील अगमकुआ येथील भागवत नगर येथे राहणाऱ्या रमेश प्रसाद यांच्या २२ वर्षीय आशा हिच्याशी डिसेंबर २०१६ मध्ये सुनिलचा विवाह झाला. सुनील एअरफोर्सच्या सिव्हीलियन पदावर कार्यरत आहे. सुनिलचे विवाहबाह्य संबंध असल्याने पत्नीने विरोध करण्यास सुरुवात केली. आशाने हे प्रकरण नातेवाईकांच्या कानावर घातले होते. नातेवाईकांनी समजल्यावरही सुनीलने त्याचे अनैतिक संबंध सुरुच ठेवले. त्यासाठी पत्नीला मारहाणही केली. अखेर तिचा काटा काढला. सध्या सुनिल पोलीसांच्या ताब्यात आहे. त्याला कठोरातील कठोर शिक्षा होण्याची मागणी होत आहे.