पटना: देवाला नमस्कार करून चोरी केल्याचा व्हिडीओ नुकताच सोशल मीडियावर व्हायरल होत असताना अजून एक घटना समोर आली आहे. रात्रीच्या अंधारात घरात घुसलेला चोर चोरी करण्याऐवजी भलतच करायला गेला. त्याचा मोह त्याच्याच गळ्याशी आला आणि अखेर बेड्या पडल्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रात्रीच्या अंधारात चोरीसाठी आलेला चोर घरात घुसला. हाताला 10 हजार रुपयांच्या नोटा लागल्या. त्या घेऊन पळून जात असताना त्याची नजर झोपलेल्या सुंदर महिलेवर पडली. तेवढ्यात या महिलेला जाग आली. ती चोराला पाहून जोरात किंचाळू लागली. महिलेचं सौंदर्य आणि रुप पाहून चोराची नियत फिरली. 


चोराने सुंदर महिलेचा हात पकडून जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. महिला जोरजोरात बचावासाठी ओरडत राहिली. या आवाजाने लोक जागे झाले आणि चोराला त्याची चाहुल लागताच त्याने तिथून पळ काढला. 



या पळणाऱ्या चोरावर गस्त घालणाऱ्या पोलिसांची नजर पडली आणि तो पकडला गेला. या प्रकरणी महिलेनं पोलिसांना या चोराची ओळख पटवण्यास मदत केली आणि त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. 


पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या असून सध्या तो तुरुंगात आहे. चोराची नियत फिरल्याने चोरीच्या मुद्देमालही गेला आणि पोलिसांच्या तावडीतही सापडला. या अजब घटनेची सर्वत्र चर्चा आहे. ही घटना  बिहारची राजधानी पटना इथल्या चौधरी टोला परिसरात घडली आहे.