मुंबई : आपल्या देशात वीज चोरी आणि पाणी चोरी या दोन्ही गोष्टी सरास होत असतात. परंतु असे असले तरी वीज चोरी करणं हे कोणाच्याही जीवावर बेतु शकतं आणि याचाच पुरावा देणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, वीज चोरी करायला गेलेल्या व्यक्तीला कसा 440 चा झटका बसला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती आपले काही पैसे वाचवण्यासाठी वीज चोरीचा पर्याय अवलंबत आहे.यासाठी हा व्यक्ती घराच्या छतावर रेंगाळत दुसऱ्या व्यक्तीच्या छतावर जातो आणि वीज चोरी करण्याचा प्रयत्न करतो. परंतु असे करत असताना एक मोठा स्पार्क होतो आणि हा व्यक्ती पटकन मागे हटतो.


तसे पाहाता या व्यक्तीचं नशीब चांगलं होतं, म्हणून त्याला काहीही झालेलं नाही. परंतु प्रत्येकाचं नशीब इतकं चांगलं असेलच असे नाही. त्यामुळे या प्रकरणाला तुम्ही गांभीर्याने घ्या.


@Adityaspoint नावाच्या अकाउंटवरुन ट्विटरवर हा व्हिडीओ शेअर केला आहे.  हा व्हिडीओ शेअर करताना युजरने हा व्हिडीओ सीतापूरचा असल्याची माहिती दिली आहे. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'सीतापूरमध्ये वीज चोरीचा एक विचित्र व्हिडीओ व्हायरल झाला आहे, एक व्यक्ती छतावर रेंगाळत वीज चोरी करत होता, त्यानंतर शॉर्ट सर्किट झाले.'



सोशल मीडियावर या व्हिडीओची अनेक लोक मजा घेत असले तरी. हे लक्षात घ्या की वीजचोरी हा मोठा गुन्हा आहे. त्यासाठी विभागाकडून दंड आकारला जातो आणि गरज पडल्यास कायदेशीर कारवाईही केली जाते. तसेच असं करणं तुमच्या जीवावर देखील बेतु शकतं.