नवी दिल्ली : शेतकरी विधेयकाचा शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचेपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बातमध्ये म्हटले. शेतकरी विधेयकामुळे शेतकऱ्यांना पाहीजे त्या दरात आणि पाहीजे तिथे शेतमाल विक्री करु शकतात. मन की बात कार्यक्रमात ते बोलत होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशातील शेतकरी, आमची गावं हाच आत्मनिर्भर भारतचा आधार आहेत. हे मजबूत असतील तर आत्मनिर्भर भारतचा पाया मजबूत होईल. कृषी विधेयकात शेतकऱ्यांना मनाप्रमाणे दर मिळेल. या नव्या विधेयकामुळे शेतकऱ्यांना पिकं विकण्याचे स्वातंत्र्य मिळेल. 



जो जमिनीशी जास्त जोडलेला असतो तो वादळांमध्ये देखील अढळ राहतो. कोरोनाच्या या कठीण काळात आपले कृषी क्षेत्र, आमचे शेतकरी याचे मुर्तीमंत उदाहरण असल्याचे पंतप्रधान मन की बात मध्ये म्हणाले.


मी आयुष्यातील मोठा काळ फिरण्यात व्यतीत केलाय. फिरणंच माझ आयुष्य होतं. प्रत्येक दिवशी नवं गाव, नवी माणसं, नवा परिवार. आपल्याकडे कथेची परंपरा आहे. धार्मिक कहाण्या सांगण्याची प्राचीन पद्धत आहे असेही ते म्हणाले.