पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर स्वादुपिंडाच्या आजारानं ग्रस्त असले तरी त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचं दिसतंय. अनेक महिन्यांच्या कालावधीनंतर पर्रिकर यांनी आपल्या निवासस्थानी  गुंतवणूक प्रोत्साहान मंडळाची बैठक घेऊन २३० कोटींच्या ११ पैंकी ७ प्रकल्पांना मंजुरी दिली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्यमंत्री पर्रीकर या मंडळाचे अध्यक्ष आहेत. तासभर चाललेल्या या बैठकीत विविध मुद्यांवर सदस्यांशी चर्चा केली. यावेळी उद्योगमंत्री, पर्यटनमंत्री उपस्थित होते. 
  
दरम्यान, सभापती डॉ. प्रमोद सावंत यांनीही पर्रीकर यांच्या भेट घेऊन आरोग्याची चौकशी केली. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती विधानसभा अध्यक्षांचे सभापती डॉ. प्रमोद सावंत यांनी दिलीय.


आज, बुधवारी मुख्यमंत्री पर्रिकर आपल्या निवासस्थानी मंत्रिमंडळाची बैठक घेत आहेत. त्यामुळे मंत्री आणि गोव्यातल्या जनतेत उत्सुकता आहे.