नवी दिल्ली : आजपासून पुढचे 4 दिवस जग इस्राईल आणि भारताच्या मैत्रीची झलक पाहणार आहे. इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू 6 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काल प्रोटोकॉल तोडून पंतप्रधान मोदी नेतन्याहू यांचं स्वागत करण्यासाठी विमानतळावर पोहोचले होते. आज नेतन्याहू पीएम मोदींना रिटर्न गिफ्ट देऊ शकतात. आज मोदी आणि नेतन्याहू यांच्यात द्विपक्षीय चर्चा होणार आहे. ज्यामध्ये अनेक करार होणार आहेत.


राष्ट्रपतींची भेट


भारत दौऱ्याच्या दूसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता राष्ट्रपती भवनमध्ये नेतन्याहू यांचं स्वागत होणार आहे. 10.30 वाजता महात्मा गांधींना ते श्रद्धांजली वाहणार आहेत. दुपारी 12 वाजता नेतन्याहू आणि पीएम मोदी यांच्यात द्विपक्षीय चर्चा होणार आहे. 5.45 वाजता नेतन्याहू राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहे.


संबंध मजबूत होणार


पंतप्रधान नेतन्याहू यांचा हा दौरा आणि 6 महिन्यात दोन्ही नेत्यांमधील ही दुसरी भेट दोन्ही देशांच्या संबंधाना आणखी मजबूत करतील. दोन्ही देशांमधील मैत्रीच्या 25 व्या वर्षात पंतप्रधान मोदी आणि नेतन्याहू यांची ही भेट भारताच्या विकासासाठी फायदेशीर ठरेल. इस्राईल आपलं तंत्रज्ञान आणि इनोव्हेशन भारताला देखील देईल अशी आशा आहे.


रद्द करारावर चर्चा


आज होणाऱ्या द्विपक्षीय चर्चेत भारताकडून रद्द करण्यात आलेला 500 मिलिअन डॉलरचा स्पाइक अँटी-टँक गायडेड मिसाईल करार यावर देखील चर्चा होऊ शकते.