छत्तीसगड : देशभर कोरोनाचा कहर आहे. आतापर्यंत देशभरात ४२,५३३ लोकांना कोरोनाची लागण झाली असून १,३७३ लोकांचा मृत्यू झाला आहे. असं असताना सीआरपीएफच्या जवानांनी देशाला संकटातून वाचवलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे नक्षलवाद्यांनी स्वयंपाकाच्या एका भांड्यात आयईडी बॉम्ब ठेवला होता. जवानांच्या युक्तीमुळे हा हल्ला टळला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दोन भांड्यांमध्ये नक्षलवाद्यांनी आयईडी बॉम्ब प्लांट केल्याची धक्कादायक माहिती समोर आली. सैनिकांना इजा पोहचवण्यासाठी नक्षलवाद्यांनी हा कट रचला होता.


छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यातील जागरगुंडा मार्गावरील दोर्णपाल गोरगुंडा दरम्यान प्रत्येकी पाच किलोचे दोन आयईडी बॉम्ब जप्त करण्यात आले. सीआरपीएफ २२३ वाहिनच्या बीडीएस पथकाने आयईडी बॉम्ब निकामी केले. नक्षलवाद्यांनी रस्त्याच्या आत १० मीटर अंतरावर झाडाजवळ आयईडी प्लांट केला होता. 


याच ठिकाणी नक्षलवाद्यांकडून याआधीही बॉम्ब ठेवण्यात आले होते. पण यावेळी रस्त्याच्या १० मीटर अंतरावर एका झाडाजवळ जेवणाच्या भांड्यामध्ये बॉम्ब लावण्यात आला होता. मात्र CRPF जवानांच्या युक्तीमुळे हा अनर्थ टळला असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.