बेळगावात आज काळा दिन
केंद्र सरकारचं अन्यायी धोरण आणि दडपशाही विरोधात सीमावासियांनी आज बेळगावात काळा दिन आयोजित करण्यात आला आहे.
बेळगाव : केंद्र सरकारचं अन्यायी धोरण आणि दडपशाही विरोधात सीमावासियांनी आज बेळगावात काळा दिन आयोजित करण्यात आला आहे.
१ नोव्हेंबर १९५६ पासून बेळगावसह संपूर्ण सीमाभाग कर्नाटकमध्ये समाविष्ट करण्यात आला होता. तेव्हा पासून सीमा बांधव १ नोव्हेंबरचा दिवस काळा दिवस म्हणून पाळतात. बेळगावमध्ये संभाजी उद्यानातून आज निषेध रॅली काढली जाणार आहे. एसपीएम रोड, शहापूर रोड, नाथ पै सर्कल मार्गे ही रॅली पुढे जाईल. मराठा मंदिर हे या रॅलीचं अंतिम स्थान आहे. मराठा मंदिर येथेच जाहीर सभा होणार आहे.
दरम्यान सोशल मिडियावर काळ्या दिनासंदर्भात पोस्ट टाकणा-या दोन मराठी भाषक युवकांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.