Married Couple Deadbody Found In Room: मधुचंद्रासाठी खोलीत गेलेल्या जोडप्याचा रहस्यमयरित्या मृत्यू झाला आहे. लग्नाच्या ४८ तासांत्या आत पती-पत्नीचा मृत्यू झाल्याने घरावर शोककळा पसरली आहे. दोघांचा मृत्यू नेमका कसा झाला हे गूढ मात्र अद्याप कायम आहे. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. त्याचा अहवाल समोर आल्यानंतरच खरे कारण समोर येऊ शकणार आहे. मात्र, त्यापूर्वी पोलिसांनी एक धक्कादायक माहिती दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मधुचंद्राच्या दिवशीच पती-पत्नीचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ पसरली होती. तसंच, आश्चर्यही व्यक्त केले जात होते. पती-पत्नीच्या संशयास्पद मृत्यूनंतर कुटुंबीयांनी त्यांचे शवविच्छेदन करण्यास नकार दिला होता. मात्र पोलिसांनी समजूत काढल्यानंतर त्यांनी शवविच्छेदन करण्यास तयारी दर्शवली. सध्या मृतदेह शवविच्छेदनासाठी आणण्यात आले आहेत. पोस्टमॉर्टम अहवाल समोर आल्यानंतरच मृत्यूचे खरे कारण समोर येऊ शकेल, असं पोलिसांनी म्हटलं आहे. 


अप्पर पोलीस अधीक्षक कुंवर ज्ञानजय सिंह यांनी एक महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. ज्या ठिकाणी दोघांचे मृतदेह पडले होते. तिथे वोमेट (उलटी केली होती. त्यामुळं प्राथमिक दृष्ट्या हे विष बाधाचे (फुड पॉइजनिंग) प्रकरण असल्याचे आढळते. पण आत्ताच काही खात्रीने सांगू शकत नाही. कारण अद्याप पोस्टमॉर्डमचे रिपोर्टसमोर आलेले नाहीत. रिपोर्ट आल्यानंतरच योग्य ती कारवाई केली जाईल. 


काय घडलं नेमकं?


३० मे रोजी प्रताप आणि पुष्पा यांचा विवाह झाला होता. वरात घरी आल्यानंतर विधी झाले तसंच, दोघांना जेवणही देण्यात आले. त्यानंतर मधुचंद्रासाठी दोघे खोलीत गेले. पण दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले. 


 खोलीचे दार तोडताच समोर दिसले भयंकर दृश्य


सकाळी उशीरापर्यंत खोलीचे दार न उघडल्याने कुटुंबीयांनी त्यांच्या खोलीचे दार वारंवार ठोठावून पाहिले. मात्र, आतून काहीच आवाज आला नाही. शेवटी प्रतापच्या लहान भावाने खिडकीतून खोलीत उडी घेतली. पलंगावर पती-पत्नी दोघांचाही मृतदेह पडला होता. त्यानंतर नवरदेवाच्या भावाने आतून लावलेली कडी उघडली आणि मग नातेवाईक खोलीत आले. त्यानंतर घरात एकच आक्रोश करण्यात आला. 


कुटुंबीयांच्या संमतीने झाले होते लग्न


घरातील इतर सदस्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर लगेचच घटनास्थळी दाखल होत पोलिसांनी दोघांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतरच काय घडलं हे स्पष्ट होऊ शकेल. तसंच, त्यांचे लग्न दोघांच्या संमतीने झाले होते. कोणावरही आमचा दबाव नव्हता, अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली आहे.