मुंबई : प्रत्येक जण आपआपल्या गोष्टी सिक्रेट ठेवत जगण पसंत करत असतो. मात्र लग्न झाल्यावर नात्यात दुरावा येऊ नये यासाठी नवऱ्याला अथवा बायकोला नात्यात दुरावा येऊ नये यासाठी सर्व सिक्रेट सांगाव्याच लागतात.मात्र तरीही महिला या गोष्टी नवऱ्यापासून नेहमीच लपवतात. जाणून घ्या या गोष्टी.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जुने प्रेम 


आजकाल लोकांमध्ये गुप्त क्रश असणे सामान्य आहे. किंवा अनेक वेळा लोक त्यांचे जुने प्रेम सहजासहजी विसरू शकत नाहीत. मुलींच्या बाबतीत असे घडते की ते आपल्या पार्टनरपासून या गोष्टी लपवतात कारण त्याचा त्यांच्या नात्यावर वाईट परिणाम होतो आणि त्यांचे नातेही बिघडते. मुली या गोष्टी आपल्या मैत्रिणींना सांगू शकतात, पण त्या आपल्या पार्टनरला या गोष्टी सांगत नाहीत.


मेसेज लपवतात


मुली अनेकदा त्यांच्या मेल फ्रेंडचे मेसेज किंवा गोष्टी त्यांच्या पार्टनरपासून लपवतात. असे घडते कारण त्यांना वाटते की त्यांच्या जोडीदाराला हे कळल्यानंतर त्यांच्यावर संशय येऊ शकतो आणि नातेही बिघडू शकते. त्याचवेळी, मुली आपल्या पार्टनरपासून त्या गोष्टी लपवतात, ज्या त्या त्यांच्या मित्रांसोबत शेअर करतात.


इच्छा लपवतात


मुली कधी कधी आपल्या जोडीदाराच्या आनंदासाठी आपल्या मनातील अनेक इच्छा दाबून टाकतात. जोडीदाराच्या आनंदात तिला तिचा आनंद दिसतो. त्यांना भीती वाटते की त्यांचे बोलणे ऐकून त्यांचा पार्टनर नाराज होऊ शकतो. नात्यासाठी ती अनेकदा तिच्या मनातील गोष्टी आत ठेवते.