भोपाळ: एअरफोर्सचे ग्रूप कॅप्टन वरुण सिंह यांच्यावर शुक्रवारी भोपाळ इथे अंत्यसंस्कार होणार आहेत. वरुण सिंह यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. लष्कराच्या थ्री-ईएमई सेंटरमध्ये असलेल्या लष्करी हॉस्पिटलपासून थोड्याच वेळात अंत्ययात्रा सुरू होईल आणि बैरागढ येथील विश्राम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कॅप्टन वरुण सिंह यांच्या निधनानंतर सिंह कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. आपल्या मुलाचा अभिमान असल्याचं सांगत वरुण यांच्या आई भावुक झाल्या. भोपाळच्या सन सिटी कॉलनीमध्ये आयोजित श्रद्धांजली सभेनंतर शहीद वरुण सिंह यांच्या आई भावुक झाल्या.


मी माझ्या मुलाला मुक्त केलं आहे. आम्ही कुटुंबाने त्याचा हात पकडून त्याला सगळ्यातून मुक्त केलं. तू आम्हाला तुझ्यामध्ये अडकून ठेवू नको. तू हवाई दलासाठी या देशासाठी जग असं आम्ही त्याला सांगितलं होतं. तो 23 तारखेला घरी येणार होता. असं म्हणत आई भावुक झाली. 



भोपाळमधील सनसिटीमध्ये वरुण सिंगचे वडील आणि आई राहत असलेल्या घरातील अनिल नावाच्या शेजाऱ्याने आईचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला. 'वरुण गौरवपूर्ण गेला आहे. त्याने इतका सन्मान, प्रेम मिळवलं आहे. ही माझी ताकद आहे. तो आपलं नशीब घेऊन आला आणि आपलं नशीब घेऊन गेला.' 


'आपल्या नशीबाशी लढायची वेळ आली तो लढला आणि आपलं नशीब सोबत घेऊन गेला. तो अपघातात गेला असता तर काही अडचण नव्हती.त्याला फक्त डीएनए चाचणी द्यावी लागली असती. या प्रश्नाचे उत्तर मला मिळाले नाही. त्याने आपले नाव, पत्ता, नंबर बोलून सांगणे आवश्यक होते. आई म्हणून खूप वेदना होत आहेत. प्रत्येकाला जावं लागणार आहे मला माहीत आहे मात्र तरीही वेदना होत आहेत.'


'वरुण आता या जगात नसला तरी वरुण माझे ऐकत आहे आणि हसत आहे. वरुण मला सांगायचे आहे की आनंदी राहा, तुमच्या ज्या काही आवडी आहेत, त्या इतरांच्या माध्यमातून पूर्ण कर. त्याने अनेकांना ट्रेंड केले आहे. तो तो पूर्ण करेल.' 


'वरुणच्या प्रशिक्षणानं त्याला वाचवलं. वरुणच्या डोक्याला एकही दुखापत नव्हती. शरीरातील हाडही तुटलेले नव्हते. भाजल्यामुळे तो निघून गेला. मी देवाला सांगते की त्याने चूक केली तर त्याचे कान धरावे आणि ओढावे असंही आई भावुक होत म्हणाली आहे.' 


तमिळनाडूतील कुन्नूर इथे हेलिकॉप्टर क्रॅशमध्ये बिपीन रावत यांच्यासह 13 जणांचा अपघाती मृत्यू झाला होता. वरुण सिंह हे या अपघातातून वाचले होते. मात्र उपचारा दरम्यान ग्रूप कॅप्टन वरुण सिंह यांचं निधन झालं.