शहीद मुलाच्या स्मारकासाठी बापाने जमीन विकली
हल्ल्याला एक वर्ष होऊनही सराकरने स्मारक न बांधल्याने शहीदाच्या वडिलांनी स्वत:ची जमीन विकली.
पाटणा : जम्मू-कश्मीरमधील उरी भागामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानाचे स्मारक बांधण्याचे आश्वासन सरकारले पाळले नाही. हल्ल्याला एक वर्ष होऊनही सराकरने स्मारक न बांधल्याने शहीदाच्या वडिलांनी स्वत:ची जमीन विकल्याची घटना समोर आली आहे. बिहारच्या गया जिल्ह्यातील शहीद सुनील कुमार या जवानाच्या वडिलांनी सराकारवर आरोप केला आहे. मुलगा शहीद झाल्यानंतर १५ दिवस अनेक बड्या-बड्या लोकांनी आपली भेट घेत मोठी आश्वासनं दिली होती, मात्र ती अद्यापही पूर्ण झाली नसल्याची खंत मथुरा यादव यांनी व्यक्त केली.
काय दिले होते आश्वासन ?
उरी हल्ल्यानंतर शहीद झालेल्या मुलाच्या गावी आरोग्य केंद्र उभारले जाणार होते. तसेच गावातील शाळेला शहीद सुनीलचे नाव आणि प्रवेशद्वार देण्याचेही सांगण्यात आले होते. पण ही आश्वासने पोकळ ठरल्याचा आरोप शहीद सुनीलचे वडील मथुरा प्रसाद यादव यांनी केला आहे.