मुंबई : 2021 च्या शेवटच्या महिन्यात मारुती सुझुकी वॅगनारने आपला दबदबा कायम ठेवला. मारुतीच्या सर्वाधिक लोकप्रिय कारपैकी एक असलेल्या WagonR ने गेल्या महिन्यात विक्रमी विक्री केली. डिसेंबर 2021 मध्ये, वॅगनारने Hyundai Creta, Nexa Baleno, Maruti Suzuki Swift, Kia Seltos आणि Tata Punch सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारला विक्रीच्या बाबतीत मागे पाडले. ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला मारुती सुझुकी अल्टोही भारतातील सर्वाधिक विक्री होणारी कार होती.


गेल्या महिन्यातील कारची विक्री


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या महिन्यात मारुती सुझुकी वॅगनारची 19,729 ग्राहकांनी खरेदी केली.  ही विक्री डिसेंबर 2020 च्या तुलनेत 11.56 टक्क्यांनी वाढली आहे. मारुती सुझुकीची WagonR डिसेंबर 2020 मध्ये 17,684 ग्राहकांनी खरेदी केली होती.


सलग 60 दिवस विक्रीत पहिला क्रमांक


मारुती सुझुकीची वॅगनार गेल्या महिन्यातच नव्हे तर सलग 60 दिवसांपासून सर्वाधिक विक्री होणारी कार आहे. यापूर्वी जून 2021 मध्ये, मारुती सुझुकी वॅगनार ही देशातील सर्वाधिक विकली जाणारी कार होती.


नोव्हेंबर 2021 मध्ये, मारुतीची WagonR 16,853 ग्राहकांनी खरेदी केली, जी नोव्हेंबर 2020 च्या तुलनेत 3.6 टक्के अधिक आहे.


मारुती सुझुकी वॅगनारचे फीचर्स


मारुती वॅगनार 8 प्रकारात येते. कंपनी आपले पेट्रोल आणि CNG दोन्ही मॉडेल्स विकते. मारुती सुझुकी वॅगनार दोन इंजिनांमध्ये येते. त्याचे 998cc इंजिन 67.05 bhp पॉवर आणि 90 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते.


भारतीय बाजारात Maruti Suzuki WagonR ची सुरुवातीची मुंबई एक्स-शोरूम किंमत 4.93 लाख रुपये आहे.