मायावतींचा राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा
राज्यसभेत सहारनपुर हिंसेवर बोलू न दिल्याने बसपाच्या अध्यक्षा मायावती यांनी त्यांच्या राजसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
नवी दिल्ली : राज्यसभेत सहारनपुर हिंसेवर बोलू न दिल्याने बसपाच्या अध्यक्षा मायावती यांनी त्यांच्या राजसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. मायावतींना सहारनपुर हिंसा प्रकरणी बोलायचे होते. परंतु सभागृहात त्याचा विरोध होत होता. तर सभापतींनी देखील त्यांना वेळ पूर्ण झाल्यानंतर थांबण्यास सांगितलं. याचा विरोध करत मायावती चांगल्याच भडकल्या. त्यानंतर त्यांनी म्हटलं की, जर बोलू नाही दिलं तर राजीनामा देईल.