MBA Chai Wala Prafull Billore: तुमच्या अंगी जर जिद्द, मेहनत आणि कठिण परिश्रम करण्याची तयारी असेल तर कोणतेही यश तुम्ही सहज मिळवू शकता. अशाच एका यशाची कहानी आता समोर आली आहे.या कहानीत एका तरूणाने (Prafull Billore) चहा विकून आलिशान मर्सिडीज कार (Mercedes Car)खरेदी केली आहे. या तरूणाची आता सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. 


कोण आहे हा चहावाला? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या चहावाल्याचे नाव प्रफुल्ल बिलोरे (Prafull Billore) आहे. प्रफुल्लने एमबीए केल्यानंतर चहा विकण्यास सूरूवात केली. आणि हळूहळू आपला स्टार्टअप देशभरात वाढवला. आता त्याचे देशभरात 100 पेक्षा जास्त आऊटलेट आहेत. तो देशभरात MBA चाय वाला म्हणून प्रसिद्ध झाला आहे. या प्रफुल्लने (Prafull Billore) चहा विकून विकून आता 90 लाख रूपयांची मर्सिडीज बेंझ (Mercedes Car) जीएलई 300 डी ही लक्झरी कार खरेदी केली आहे. ही त्याची कार पाहून सर्वच थक्क झाले आहेत.


इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर  


MBA चायवाला म्हणून प्रसिद्ध असलेल्या प्रफुल्ल बिलोरने (Prafull Billore)इंस्टाग्रामवर पोस्ट करून आलिशान कार घेतल्याची माहिती दिली. प्रफुल्लने एक फोटो शेअर केला आहे.या फोटोमध्ये तो त्याच्या कुटुंबासह आणि नवीन कार मर्सिडीज बेंज GLE 300d सोबत दिसत आहे. हा फोटो शेअर करत तो कॅप्शनमध्ये लिहतो की, 'देवाचा आशीर्वाद', 'कुटुंबाचा पाठिंबा', 'प्रत्येकाची मेहनत आणि जगभरातील लोकांचे प्रेम आणि आशीर्वाद'. 'आज Mercedes GLE 300D नवीन पाहुणी म्हणून घरी आली आहे'. 'देव सर्वांचे कल्याण करो'. या त्याच्या पोस्टवर त्याला लोक शुभेच्छा देत आहेत, त्यासोबत कमेंट आणि लाईक्सचा पाऊस पडतोय. 



असा सुरू केला स्टार्टअप


प्रफुल्ल बिलोर (Prafull Billore) यांनी 2017 मध्ये केवळ 8 हजार रूपयांच्या  गुंतवणुकीतून एमबीए चाय वाला व्हेंचर सुरू केले होते. त्यानंतर 3 वर्षाच्या संघर्षानंतर त्याचा स्टार्टअप संपुर्ण देशभरात पोहोचला आणि त्याचे आयुष्य बदलले. कठोर परिश्रमानंतर आज देशभरात त्याचे 100 हून अधिक आऊटलेट्स आहे. लवकरच तो अमेरीकेत आऊटलेट उघडण्याची तयारी करत आहे. 


कारचे फिचर्स काय? 


प्रफुल्ल बिलोरने (Prafull Billore) जी नवीन मर्सिडीज-बेंझ GLE 300D कार विकत घेतली आहे, त्यात 3.0-लिटर 6-सिलेंडर इंजिन आहे, जे 435 hp पॉवर आणि 520 न्यूटन मीटर पिकअप टॉर्क जनरेट करते. या मस्त कारला 9 स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन मिळते आणि ती फक्त 5.3 सेकंदात 0-100 किमी प्रतितास वेग घेऊ शकते. Mercedes Benz GLE 300d चा टॉप स्पीड 250 kmph आहे.


दरम्यान प्रफुल्ल बिलोरची (Prafull Billore) कहानी लाखो तरूणांना प्रेरणा देणारी आहे. कारण प्रफुल्ल बिलोर आपले स्टार्टअप देशभरात पोहोचवले आहे. असे स्टार्टअप तरूण सुरू करून आपले स्वप्न पुर्ण करू शकतात.