MDH New Face Revealed: एमडीएच मसाले हे भारतातील सर्वात प्रसिद्ध मसाल्यांपैकी एक आहेत. मसाला किंग आणि एसडीएचचे शिल्पकार म्हणून प्रसिद्ध असलेले धरमपाल गुलाटी यांनी कठोर परिश्रमानंतर या कंपनीला देशातील सर्वात यशस्वी कंपन्यांपैकी एक बनवले आहे. 1919 मध्ये त्यांचे वडील चुन्नीलाल गुलाटी यांनी 'महाशियां दी हट्टी' म्हणजेच एमडीएचची सुरुवात केली. महाशय धरमपाल गुलाटी यांनी अवघ्या 1000 रुपयांमध्ये ही कंपनी सुरू केली होती. महाशय धरमपाल गुलाटी यांच्या चेहरा जाहिरातीच्या माध्यमातून समोर आला होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून एमडीएचच्या जाहिरातींमध्ये नवा चेहरा पाहायला मिळत आहे. चला जाणून घेऊया कोण आहेत ते?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एमडीएचचे मालक महाशय धरमपाल गुलाटी यांचे डिसेंबर 2020 मध्ये निधन झाले. यानंतर आता ही कंपनी विकली जाणार असल्याची अफवा पसरली होती. त्याचवेळी मसाल्यांच्या जाहिरातींमध्ये त्यांची जागा कोण घेणार, अशीही चर्चा रंगली होती. दरम्यान, एमडीएच मसाल्याच्या जाहिरातींमध्ये नवा चेहरा दिसू लागला आहे. हा नवा चेहरा दुसरा तिसरा कोणी नसून, धरमपाल गुलाटी यांचा मुलगा आणि कंपनीचे चेअरमन राजीव गुलाटी यांचा आहे. 



राजीव गुलाटी यांनी ट्विट करून कंपनी विकली जाणार असल्याच्या बातम्यांचे खंडन केले आहे. त्यांनी लिहिलं आहे की, 'ही बातमी पूर्णपणे खोटी, बनावट आणि निराधार आहे. एमडीएच प्रायव्हेट लिमिटेड हा आमचा वारसा आहे. जो महाशय चुन्नीलाल आणि महाशय धरमपाल यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य उभारण्यासाठी समर्पित केला आहे. तो वारसा पुढे नेण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. कृपया अशा अफवांवर लक्ष देऊ नका, विश्वास ठेवू नका.'