नवी दिल्ली : दहशतवाद आणि चर्चा एकाच वेळी होऊ शकत नाही अशी कठोर भूमिका घेणाऱ्या भारतीय बाजूनं पाकिस्तानशी सगळेच संपर्क तोडून टाकल्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळालाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारत आणि पाकिस्तानच्या सुरक्षा सल्लागारांनी डिसेंबर महिन्यात एकमेकांशी चर्चा केल्याचं आपल्या परराष्ट्रखात्यानं स्पष्ट केलंय. ही भेट आणि चर्चा थायलंडमध्ये झाली होती.


भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार लेफ्टनंट जनरल नसीर खान जाज्वा यांच्यात दोन्ही देशांच्या संबंधांविषयी चर्चा केल्याचं भारतानं मान्य केलंय.