बार्डा : नर्मदा बजाओ आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांनी या प्रकल्पाविरोधात मध्य प्रदेशातील बार्डा इथं जलसत्याग्रह आंदोलन केलंय. सरदार सरोवर प्रकल्पात कमाल पाणीसाठा रहावा म्हणून राज्यातील नागरिकांच्या हिताकडे दुर्लक्ष करत राज्य सरकारनं इंदिरा सागर आणि ओंकारेश्वर धरणातून पाणी सोडल्याचा आरोप मेधा पाटकर यांनी केलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बार्गी आणि तवा या दोन्ही प्रकल्पात पुरेसा पाणीसाठा नाही. असं असतानाही लोकार्पण सोहळ्यासाठी सरदार सरोवरात कमाल पाणी रहावं म्हणून हे पाणी सोडण्यात आलं मात्र या पाण्यामुळे सरदार प्रकल्पातील पाण्याची पातळी वाढून बरवानी जिल्ह्यातील अनेक गावं पाण्याखाली गेलीत. या ग्रामस्थांच्या मोबदल्यासाठी मेधा पाटकरांनी आंदोलन पुकारलंय.