नवी दिल्ली : जाकतिक महासत्ता अमेरिकेचा प्रतिस्पर्धी आणि भारताचा साम्राज्यवादी शेजारी चीनने दोन्ही देशांसमोर एक भलतेच आव्हान उभे केले आहे. लष्करी अर्थसंकल्पात भरमसाठ वाढ करणाऱ्या चीनने आता मानवविरहीत टॅंकची टेस्ट केली आहे. हा टॅंक रिमोटच्या सहाय्याने चालतो. शी जीनपींग यांना चीनच्या राष्ट्राध्यक्षपदावर राहण्याचा अमर्याद अधिकार प्राप्त झाल्यापासून त्यांनी लष्करी ताकद वाढविण्याचा चांगलाच सपाटा लावला आहे. त्यांच्या या धोरणामुळे भारत आणि अमेरिकेसमोर नवीच चिंता उभी राहीली आहे. हे आव्हान दोन्ही देश कसे परतवून लावतात याकडे जगाचे लक्ष लागले आहे.


चीनचे जगासमोर आव्हान


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, या टॅंकच्या चाचणीबाबत अद्याप विशेष असे प्रभावी यश चीनला लाभले नाही. मात्र, भविष्यात चीन जर यात यशस्वी झाला तर, मात्र भारत- अमेरिकाच नव्हे तर, जगासमोरही ते मोठे आव्हानच असेल. दरम्यान, चीनचे सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सने प्रकाशित केलेल्या एका अहवालानुसार मानवरहीत असलेला हा टॅंक आर्टिफिशल इंटेलिजन्सयुक्त असेन. तसेच, तो मानवरहीत टॅंकसोबत कामही करेल. अहवालात म्हटले आहे की, हा टॅंक सॅटेलाईट, एअरक्राफ्ट आणि सबमरीन कडून मिळणाऱ्या इनपुटला जागा तयार करण्याची क्षमताही ठेवतो.


चीन करतोय सैन्याचे आधुनिकीकरण


गेल्या काही वर्षांपासून, चीन मानवरहीत ग्राऊंड व्हेईकल (UGVs) आणि मानवरहीत एरियल व्हेईकल (UAVs) निर्माण करण्यासाठी प्रचंड प्रयत्नशिल आहे. मानवरहीत टॅंकशिवाय स्टील फायटर प्लेन आणि एअरक्राफ्ट कॅरिअर बनविण्यासाठीही चीन प्रयत्नशिल आहे. सैन्याचे अत्याधुनिकीकरण करून चीन जगाला आव्हानात्मक इशारा देऊ इच्छितो.


चीनच्या सरकारी टीव्हीर दाखवल्या गेलेल्या फुटेजमध्ये टाईप ५९ मेन बेटल टॅंक (MBT) ला रिमोट कंट्रोलच्या सहाय्याने चालवले जात आहे. दरम्यान, एका अहवालात असेही म्हटले आहे की, हा टॅंक लष्करात दाखल करण्यापूर्वी त्यातील अनेक तांत्रिक त्रुटी दूर करण्याचे काम सुरू आहे.