नवी दिल्ली : पेंशनधारकांसाठी लवकरच एक चांगली बातमी मिळू शकते. मोदी सरकार सगळ्या पेंशनधारकांना मेडिकल बेनिफिटची एक योजना आणणार आहे. पण पेंशनधारकांना ईपीएफचा मेंबर असचं आवश्यक असणार आहे. सोबतच सरकारी कमचाऱ्यांच्या पेंशन स्कीममध्ये सुधार आणण्यासाठी एक उच्च स्तरीय कमिटी देखील नेमली जाणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केंद्रीय मंत्री बंडारु दत्तात्रय यांनी शुक्रवार लोकसभेत ही माहिती दिली. त्यांनी म्हटलं की, 'कर्मचारी राज्य बीमा निगम (ESIC)सोबत मिळून आण्ही  त्या पेंशनधारकांना एक मेडिकल बेनिफिट स्कीम आणत आहोत जे ईपीएफ मेंबर आहेत. ही एक चिकित्सा लाभ योजना आहे. यावर विस्तारात अजून काम सुरु आहे.


केंद्रीय मंत्र्यांनी म्हटलं की, मी आदेश दिले आहेत की, ईपीएस 1995 चं मूल्यांकन केलं जावं. जेथेही वेळ लागत असेल तो कमी केला जावा.