नवी दिल्ली : ३० मे रोजी देशातील सर्व मेडिकल स्टोर्स बंद राहणार आहेत. औषधांच्या विक्रीवर सरकारने लावलेले कडक नियम शिथिल करण्याच्या मागणीसाठी ऑल इंडिया ऑर्गनायजेशन ऑफ केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्टने एक दिवसाचा संप पुकारला आहे. असोसिएशनच्या या संपाचा फटका मात्र सर्वसामान्य लोकांना बसणार आहे. २९ मे रोजी रात्री १२ वाजता संप सुरू होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑल इंडिया ऑर्गनायजेशन ऑफ केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्टच्या अंतर्गत देशभरात एकूण ९ लाख मेडिकल आहेत. मेडिकलच्या या संपाची पूर्वसूचना पंतप्रधान कार्यालय, आरोग्य मंत्रालय, गृह मंत्रालय तसंच औषध नियंत्रक कक्षात देण्यात आली आहे. सरकार आमच्या मागण्यांकड दुर्लक्ष करतं असल्याचा आरोप मेडिकल असोसिएशनने केला आहे. ३० मे रोजी दिल्लीतील जंतर-मंतरवर सरकारच्या विरोधात निदर्शनसुद्धा केली जाणार आहेत.


औषध विक्रेत्यांकडून मिळत असलेलं कमिशन वाढवून मिळण्याची मागणी होत आहे. औषध विक्रेत्यांना सध्या विक्रीवर 16 टक्के कमिशन दिलं जातं आहे. औषधांच्या ऑनलाईन विक्रीवरसुद्धा मेडिकल असोसिएशनने आक्षेप घेतला आहे. औषध ऑनलाईन विकल्यामुळे मेडिकलचं उत्पन्न घटतं आहे तसंच औषधाचा दुरूपयोग होऊ शकतो असं असोसिएशने म्हटलं आहे.